DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का!

अमित देशमुखांच्या निकटवर्तीयांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

DD News Marathi by DD News Marathi
November 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का!

लातूर प्रतिनिधी :
दि. २६ नोव्हेंबर २०२५

राज्यात आगामी २ डिसेंबरला होणाऱ्या नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लातूरच्या राजकारणात आज महत्त्वाची उलथापालथ झाली आहे. लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि काँग्रेसचे प्रभावी युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विक्रांत गोजमगुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत गोजमगुंडे यांनी औपचारिकरित्या राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. २०१९ ते २०२२ या काळात त्यांनी लातूर महापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते काँग्रेसचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे गोजमगुंडे यांचे पक्षांतर हा देशमुखांसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

अमित देशमुखांच्या गोटात खळबळ

कधीकाळी अमित देशमुखांचे निष्ठावान समर्थक म्हणून गोजमगुंडे यांची ओळख होती. पण आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच लातूरमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत या घडामोडींचा फटका काँग्रेसला बसू शकतो, अशा चर्चा शहरभर रंगल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेला संताप

विधानसभा निवडणुकांच्या वेळी, लातूर शहरात मजबूत पकड असूनही गोजमगुंडे यांना अहमदपूर मतदारसंघात पाठवण्यात आले होते. त्यावेळीच त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती. काहींचे म्हणणे आहे की, त्यांना मुद्दाम लातूरपासून दूर ठेवण्यात आले आणि हा कलह आज पक्षांतराच्या रूपात उघड झाला आहे. गोजमगुंडे यांच्या जाण्यामुळे लातूर महापालिकेत काँग्रेसला आपला तोटा भरून काढणे कठीण जाईल, असे विश्लेषकांचे मत आहे.

आगामी निवडणुकांमध्ये याचा काँग्रेसला प्रत्यक्षात किती फटका बसतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र लातूरमधील राजकीय जाणकारांचे मत स्पष्ट आहे—विक्रांत गोजमगुंडे यांच्या पक्षबदलामुळे काँग्रेसला निश्चितच नुकसान होऊ शकते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#latur#NCP#vikrantgojamgunde
Previous Post

रोहित शर्माचे अधुरे स्वप्न सूर्यकुमार यादव पूर्ण करणार!

Next Post

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत भरत सुरेशदास शहा यांचे पारडे जड!

Next Post
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत भरत सुरेशदास शहा यांचे पारडे जड!

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत भरत सुरेशदास शहा यांचे पारडे जड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.