सोलापुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
कोरोना काळात लोकांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडवण्यासाठी दिग्विजय बागल महिन्यापासुन तालुक्याचा दौरा करत आहेत. या दरम्यान नागरींकानी केलेल्या तक्रारी शासन दरबारी पोहचवण्याचे काम मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी सुरु केले असुन मागण्या पूर्ण होई पर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे बागल म्हणाले.
कोरोना काळात लोकांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडवण्यासाठी दिग्विजय बागल महिन्यापासुन तालुक्याचा दौरा करत आहेत. काही गावामध्ये गेले असताना दिग्विजय बागल यांच्या लक्षात आले की भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होण्याची दाट शक्यता आहे. जर कुकडी प्रकल्पाचे पाणी कर्जत मधील चौंडी चारीतून बिटरगाव , तरटगाव व पोटेगाव बंधाऱ्यात सोडले तर त्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना व्यवस्थित चालू राहतील व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
सध्या जमीन ओली असल्या कारणाने चारीतून पाणी सोडण्याची योग्य वेळ आहे. जेणेकरून पाणी शेवट पर्यंत पोहचेल आणि त्याचा सर्वांनाच फायदा होईल. म्हणून दिग्विजय बागल यांनी तेथील गावकऱ्यांना सांगितले होते की लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्या बाबत विनंती करतो.
आज दिग्विजय बागल यांनी मंत्रालय येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची या संदर्भात भेट घेऊन त्यांना जातीने लक्ष घालण्याची विनंती केली . विषयाची गंभीरता लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी तात्काळ संबंधीत अभियंत्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
बातमी नक्की शेअर करा