DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत भरत सुरेशदास शहा यांचे पारडे जड!

प्रचारात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा लक्षणीय सहभाग!

DD News Marathi by DD News Marathi
November 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत भरत सुरेशदास शहा यांचे पारडे जड!

इंदापूर प्रतिनिधी :
दि. २६ नोव्हेंबर २०२५

येत्या २ डिसेंबर रोजी राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुका संपन्न होत आहेत. इंदापुरातही या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतशी उत्साह आणि उत्कंठा शिगेला पोहोचत आहेत.
येथे नगराध्यक्षपदासाठी भरत सुरेशदास शहा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा प्रचार मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. जनसामान्यांचा पाठिंबा आणि प्रचारात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग शहा यांचे पारडे दिवसागणिक जड करतो आहे. याशिवाय राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेही या प्रचारमोहिमेत सक्रियपणे उतरले आहेत हे विशेष! भरणे यांच्या प्रचारसभांना होणारी वाढती गर्दी बरेच काही सांगून जाते आहे. शिवाय त्यांच्या पत्नी सौ. सारिका दत्तात्रय भरणे याही शहा यांच्या प्रचारात सामील झाल्या आहेत. त्यांना विशेषतः महिलांचा मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे.

सदर प्रतिनिधीने इंदापूर शहरातील जनतेशी संपर्क साधला असता शहा यांच्याबद्दल अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शहा यांची जनसेवेची वृत्ती, त्यांचे जनतेशी असलेले जवळचे नाते, त्यांची कर्तव्यदक्षता याबाबत लोक भरभरून बोलले. आम्ही त्यांनाच मत देणार असाच एकंदरीत सार्‍यांचा सूर होता.

या सर्व गोष्टी विचारात घेता दर दिवशी भरत सुरेशदास शहा यांचे पारडे जड होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नगराध्यक्षपदाची माळ किती मताधिक्याने त्यांच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असेच येथील वातावरण पाहता जाणवते आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #bharatshaha#DattaBharne#NCP
Previous Post

लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का!

Next Post

राम मंदिरातील ध्वजारोहणानंतर पाकिस्तानची कुरापत!

Next Post
राम मंदिरातील ध्वजारोहणानंतर पाकिस्तानची कुरापत!

राम मंदिरातील ध्वजारोहणानंतर पाकिस्तानची कुरापत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.