DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार- महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ, गोविंदा आदींची उपस्थिती.

DD News Marathi by DD News Marathi
November 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार- महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे प्रतिनिधी :
दि. २६ नोव्हेंबर २०२५

“श्रीनाथ भिमाले हे फक्त प्रभागापुरते किंवा परिसरापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण शहरात काम करणारे नेते आहेत. त्यांनी सॅलिसबरी पार्क, मुकूंदनगर व मार्केटयार्ड परिसरासह शहरात मोठे काम केलं आहे. काही स्वप्न वेळ आल्याशिवाय पूर्ण होत नसतात. त्यासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागते. म्हणूनच, श्रीनाथ भिमाले यांचे स्वप्नं सुद्धा नक्कीच पूर्ण होईल” असे मत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

श्रीनाथ भिमाले हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार होते. मात्र, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळाल्याने भिमाले यांचे आमदार होण्याचं स्वप्नं अपूर्ण राहिले आहे. २००९ पासून त्यांना प्रत्येकवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली. २०२४ साली झालेल्या विधानसभेच्या वेळी भिमाले यांनी पर्वती मतदारसंघात जोरदार तयारी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक वरिष्ठांनी त्यांना विनंती केल्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेऊन माधुरी मिसाळ यांच्या विजयासाठी खिंड लढविली. त्यांच्या प्रभागातून त्यांनी माधुरी मिसाळ यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन भाजपशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले होते. या पार्श्वभूमीवर भिमाले यांनी आयोजित केलेल्या भव्य वाढदिवस सोहळ्या प्रसंगी महसुलमंत्री बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे श्रीनाथ भिमाले यांच्याविषयी महसुल मंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

सॅलिसबरी पार्क येथे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या वाढदिवसनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागरी उड्डयन आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजेशजी पांडे तसेच सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता गोविंदा व इतर मान्यवर तसेच नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

“बावनकुळे साहेबांनी माझ्या वाढदिवसासाठी येण्याचे एका क्षणात मान्य करून ते या सोहळ्यास उपस्थित राहिले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एखादं मोठं पद मिळाल्याचा आनंद मीळवून दिला. आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारणारे आमचे नेते आहेत,” असं श्रीनाथ भिमाले आपल्या भाषणात म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या भाषणात श्रीनाथ भिमाले यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महाराष्ट्र कार्यकारिणीमधील सदस्य आणि पुणे शहराला ज्यांनी विकासाचा आयाम दिला, असे आमचे सर्वांचे मित्र, आपणां सर्वांच्या परिवारांमध्ये ज्यांना हृदयात स्थान आहे असे माननीय श्रीनाथ भिमालेजी यांचा आज वाढदिवस आहे. मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की, श्रीनाथजी भिमाले यांना उदंड आयुष्य लाभू दे! भिमाले परिवार हा सुखी संपन्न राहावा आणि त्यांनी येत्या काळात पुण्याच्या विकासासाठी, पुणे शहर, पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी अधिक चांगलं काम करावं.”

या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रपट अभिनेते गोविंदा यांचीही उपस्थिती लक्षवेधक ठरली. त्यांच्या जबरदस्त नृत्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शिवाय या कार्यक्रमासाठी इंडियन आयडॉल फेम गायक चैतन्य देवढे,अश्विनी भिडे, चंदनजी कांबळे यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. नागरिकांचा अलोट प्रतिसाद या एकूण समारंभास मिळाला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ChandrashekharBavankule#govinda#shrinathbhimale
Previous Post

नात्यात प्रेम-विश्वासाचा अभाव? कमला पसंद मालकाच्या सुनेने जीवनयात्रा संपवली.

Next Post

खाकीतील देवदूताने धावपळ करून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा वाचवला जीव!

Next Post
खाकीतील देवदूताने धावपळ करून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा वाचवला जीव!

खाकीतील देवदूताने धावपळ करून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा वाचवला जीव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.