DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“माझ्या पुढे-मागे प्रचंड शक्ती आहे!” बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची गर्जना!

चर्चांना उधाण.

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in महाराष्ट्र
0
“माझ्या पुढे-मागे प्रचंड शक्ती आहे!” बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची गर्जना!

बुलढाणा प्रतिनिधी :
दि. २७ नोव्हेंबर २०२५

बुलढाण्यात आयोजित सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांना थेट इशारा दिला. “मी एकदा काही ठरवलं, तर मग स्वतःचंही ऐकत नाही. शिवसेना पराभूत करणं अवघडच नव्हे तर अशक्य आहे. मी ‘शोले’मधल्या असरानीसारखा ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ म्हणणारा नाही. माझ्या मागे आणि पुढे खूप मोठी ताकद उभी आहे”, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका बाण कोणाकडे होता, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, तसेच उमेदवार पूजा गायकवाड उपस्थित होते.

“लाडकी बहिण योजना कोणीही बंद करू शकत नाही”

शिंदे पुढे म्हणाले, “कोणीही मायचा लाल आला तरी लाडकी बहिण योजना थांबणार नाही, हा माझा शब्द. काही लोक असत्य बोलून गोंधळ माजवत आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करा. आरोप, टीका करणं हा आमचा व्यवसाय नाही. आमचं ध्येय एकच—विकास! त्यासाठी नगरविकास विभागातून आवश्यक निधी मी दिला आहे आणि देत राहीन.”

ते पुढे म्हणाले की ते फक्त प्रचारासाठी नाही, तर जनता भेटण्यासाठी येथे आले आहेत.
“मुख्यमंत्री झाल्यापासून ही बुलढाण्यातली माझी सहावी भेट आहे. तुम्ही मागाल ते दिलं. आता तुमच्याकडूनही अपेक्षा आहे—विधानसभेत जसा भरघोस विजय दिला, तसाच नगरपालिकेतही भगवा फडकवायचा आहे.”

त्यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती बघता निवडणुकीतही लोक ठाम उभे राहिले तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. “शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत,” असेही ते म्हणाले आणि पक्षाचा किल्ला कायम राखण्याचे आवाहन केले.

“मंत्र दिला आणि संजय गायकवाड बदलला”

आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले,
“संजय कधी कधी कामाच्या गडबडीत चूक करतो, पण त्यामागची भावना सामान्यांना न्याय मिळावा हीच असते. मी त्याला काही मार्गदर्शन केलं आणि तो आता सुधारला आहे. तो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आहे.”

शिंदे पुढे म्हणाले,
“संजय, रोज एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्यासमोर दोन मिनिटं शांत उभा रहा आणि त्यांचा इतिहास मनात आण. मग तुला कधीही मागे वळून पाहावं लागणार नाही.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #buldhana#EknathShinde
Previous Post

“मॅच हरल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाला” — ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेला फोटो व्हायरल!

Next Post

टी-सीरिजचे मालक भूषण कुमार दिव्या खोसलाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते!

Next Post
टी-सीरिजचे मालक भूषण कुमार दिव्या खोसलाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते!

टी-सीरिजचे मालक भूषण कुमार दिव्या खोसलाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.