DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“फडणवीसांनी सांगितलं म्हणूनच उदय सामंत शिंदेंसोबत गेले!

आता पुढे ते कुठे वळणार सांगता येत नाही” — वरिष्ठ नेत्याचा सनसनाटी आरोप.

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“फडणवीसांनी सांगितलं म्हणूनच उदय सामंत शिंदेंसोबत गेले!

पुणे प्रतिनिधी :
दि. २७ नोव्हेंबर २०२५

पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीत विरोधी पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी काँग्रेस आणि भाजप दोघांवरही चोख प्रहार केला.

“सरकारविरोधी प्रत्येक आंदोलनात मनसे आमच्यासोबत असते—रस्त्यावर, सभांमध्ये, पत्रकार परिषदेत. मग महापालिका निवडणुकीत मनसेला महाविकास आघाडीत घेताना आक्षेप कशाचा?” असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

अहिर यांनी स्पष्ट सांगितले की मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

याचदरम्यान त्यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली—
“उदय सामंत हे एकनाथ शिंदेंसोबत भाजपच्या सांगण्यावरून गेले होते, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार,” असे ते म्हणाले.

दुबार नावनोंदणीचा मुद्दा — निवडणुकीला स्थगितीची मागणी

अहिर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मतदारयादीतील गोंधळावरही ताशेरे ओढले.
त्यांच्या म्हणण्यांनुसार अनेक मतदारांची दुबार नावे, पत्ता आणि नावात तफावत, नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागांत टाकणे आणि महापालिकेकडे घराघरांची तपासणी करण्याइतके मनुष्यबळ नसणे या सर्व त्रुटींमुळे मतदारयादी पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजनान थरकुडे, माजी सभागृहनेता अशोक हरणावळ, वसंत मोरे आणि अनंत घरत उपस्थित होते.

“हिंदुत्वाचा मुद्दा करतात, पण गणेशोत्सव मंडळांना नोटिसा” — भाजपवर टीका

अहिर यांनी भाजपवर आणखी एक आरोप करत सांगितले—
“हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपनेच शहरातील गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणाच्या नावाखाली नोटिसा दिल्या. हे दुटप्पी वर्तन आहे.”

उदय सामंतांवर सूचक टिप्पणी — “आता कुठे जाणार नाहीत असे नाही”

अहिर म्हणाले, “महायुतीत घराघरात भांडणं सुरू आहेत. दोन दादांमध्ये ‘तिजोरी’वरून राजकारण तापलेलं आहे. भाजपने स्वार्थासाठी पक्ष फोडले. शिवसेनेतील बरेच लोक भाजपमध्ये सामील होत आहेत. काही वर्षांपूर्वी शिंदेंसोबत गेलेल्या गटात बच्चू कडू आणि उदय सामंत हे फडणवीसांच्या सांगण्यावरूनच गेले.
आता सामंत पुन्हा दिशाच बदलणार नाहीत, हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#MNS#sachinahir#UdaySamant
Previous Post

अलिबागमध्ये राजकीय गणित उलटणार?

Next Post

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजूरी!

Next Post
पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजूरी!

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजूरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.