DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भाजपा आमदाराकडून माझ्या जीवाला गंभीर धोका!

वकील असीम सरोदे यांचा धक्कादायक आरोप

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
भाजपा आमदाराकडून माझ्या जीवाला गंभीर धोका!

बीड प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच राम खाडे यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांनी तब्बल १००० कोटींच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा मुद्दा पुढे आणला. ही कागदपत्रे माझ्याकडे होती आणि मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता, असे वकील असीम सरोदे यांनी सांगितले. यानंतर लवकरच राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आता माझ्याही जीवाला सुरेश धस यांच्या लोकांकडून धोका असल्याचा धडकी भरवणारा दावा सरोदे यांनी केला आहे.

हल्ल्यानंतर राम खाडेंच्या निकटवर्तीयांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवस्थानाची १००० कोटींची जमीन हडपल्याचा प्रकार राम खाडे यांनी उजेडात आणला होता आणि त्याचाच राग त्यांच्या जिवावर उठवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या राम खाडे पुण्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. असीम सरोदे यांच्या खुलाशामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

असीम सरोदे यांनी पुढे सांगितले की, हजारो एकर देवस्थानाच्या जमिनी खासगी मालमत्तेप्रमाणे वळवून घेण्यात आल्या. सुरेश धस यांनी पदाचा गैरवापर करून त्या जमिनींचे प्लॉट पाडले आणि विक्री केली, असा गंभीर आरोप राम खाडे यांनी पुराव्यासह केला होता. हे संपूर्ण प्रकरण बीड जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम खाडे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे मिळवली होती. स्थानिक पोलिसांकडे तक्रारी केल्या गेल्या परंतु त्यावर कारवाई न झाल्याने शेवटी मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीसोबत दोनशे ते तीनशे कागदपत्रे जोडण्यात आली होती, असे सरोदे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या जमिनींचा घोटाळा झाल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे होते. त्यामुळे आता सुरेश धस यांच्याकडून माझ्या सुरक्षेलाही धोका आहे. देवस्थानांची जमीन हडपल्याच्या या प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढली असून, या प्रकरणात भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #$ramkhade#advaseemsarode#beed#SureshDhas
Previous Post

अजितदादांचा सज्जड इशारा! पुण्यातील ‘राजकीय दादांची’ घाबरगुंडी!

Next Post

स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं!

Next Post
स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं!

स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.