DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पोलिसांची धाड; वृद्धाला पकडलं आणि रहस्य उघडकीस!

३६ वर्षे सुरू असलेली पळापळ-लपंडाव अखेर संपला; शेजाऱ्यांची चकित अवस्था.

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in ताज्या बातम्या
0
पोलिसांची धाड; वृद्धाला पकडलं आणि रहस्य उघडकीस!

लखनऊ प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

उत्तर प्रदेशातील बरेली येथे भावाच्या खुनानंतर तब्बल ३६ वर्षे पोलिसांना चकवणारा प्रदीप सक्सेना शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि सलग तपासानंतर प्रदीपचा मागोवा घेण्यात यश मिळाले. १९८७ मध्ये त्याने आपल्या भाऊ संजीव सक्सेनाची हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९८९ मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला आणि त्यानंतर कधीच सापडला नव्हता. अखेर मुरादाबादमध्ये त्याला अटक करण्यात आली असून ७० वर्षांच्या प्रदीपची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली आहे.

गुन्ह्यानंतर प्रदीप आणि त्याच्या कुटुंबाने गाव कायमचे सोडले. प्रदीप सतत ठिकाणे बदलत राहिला. काही काळ त्याने मुरादाबादच्या ट्रान्सपोर्ट नगरात हेल्पर आणि नंतर ट्रक चालक म्हणून काम केले. त्याच काळात त्याची एका मुस्लिम विधवेशी ओळख झाली. त्याने धर्मांतर करून तिच्याशी निकाह केला आणि स्वतःचे नाव बदलून ‘अब्दुल रहीम’ असे ठेवले. तो इस्लाम नगरातील तुर्की इंटर कॉलेजजवळ वास्तव्य करू लागला.

आपली खरी ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी वाढवून मुस्लिम व्यक्तीचा वेष धारण केला. नातेवाईकांशी सर्व संबंध तोडून टाकले. पॅरोल संपल्यानंतर न्यायालयाने त्याच्या जुन्या घरी अनेकवेळा समन्स पाठवले, नोटिसा बजावल्या, मात्र तो सापडत नव्हता. अखेर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांत त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी शोध तीव्र केला.

तपासादरम्यान पोलिसांना प्रदीपचा भाऊ सुरेश बाबू सापडला. सुरुवातीला तो काहीही माहिती देण्यास तयार नव्हता. परंतु चौकशीत त्याने अखेर प्रदीपबद्दलचे तपशील कबूल केले. प्रदीपने धर्मांतर केल्याचे आणि तो मुरादाबादमध्ये वाहनचालक म्हणून काम करीत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी छापा मारून प्रदीपला अटक केली.

प्रदीपच्या अटकेनंतर त्याच्या परिसरात राहणारे लोक थक्क झाले. त्यांना त्याच्या भूतकाळाबद्दल काहीच कल्पना नव्हती. एक खुनी इतकी वर्षे त्यांच्या शेजारी राहत होता, हे कळताच ते अवाक झाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #lucknow
Previous Post

जानेवारीत निवडणुका घेणे कठीण!

Next Post

नाशिकहून कोकण सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा साताऱ्यात अपघात!

Next Post
नाशिकहून कोकण सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा साताऱ्यात अपघात!

नाशिकहून कोकण सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा साताऱ्यात अपघात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.