कोल्हापुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १६ जुन २०२१
आज कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चा झाला. विशेष म्हणजे भर पावसात ही सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते.
कोल्हापुरातल्या या मुक मोर्च्यास सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, कोल्हापुर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून ह्या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. या मोर्च्याचे विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर ही सहभागी होते. त्यांनी छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चात सहभाग नोंदविला.
प्रकाश आबंडेकर व युवराज संभाजीराजे यांची नुकतीच पुण्यात आंबेडकर यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणप्रश्नी बैठक झाली होती. या बैठकीत आबंडेकर यांनी संभाजीराजे यांना राजकीय प्रवाहात एकत्रित येण्याची ही साद घातली होती. त्यामूळे आज प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरातील मोर्चातील सहभाग त्या अर्थाने महत्वाचा मानला जात आहे. पुढील काळात महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलू शकतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती राजर्षी शाहु महाराज या दोघांचे ही वंशज आज एकत्र आले आहेत. कदाचित हे दोघे नवी कोणती सामाजिक व राजकीय मांडणी करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.