डीडी न्यूज प्रतिनिधी
दि. ०८ डिसेंबर २०२५
राज्यातील आंबा, संत्रा आणि काजू पिकांच्या नोंदणी प्रक्रियेला शेतकऱ्यांची पडताळणी उशिरा झाल्याने गती मिळत नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने नोंदणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली आहे. ही मुदतवाढ RWBCIS अंतर्गत रब्बी २०२५-२६ हंगामातील सर्व अधिसूचित जिल्ह्यांना लागू राहणार आहे अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्य शासनाच्या विनंतीनुसार विमा कंपन्यांचा आढावा घेतल्यानंतर Bajaj Allianz General Insurance Company Ltd. आणि Generali Central Insurance Company Ltd. यांनी या मुदतवाढीस मान्यता दिली आहे. Universal Sompo General Insurance Company Ltd. यांनी NCIP पोर्टल सुरु झाल्यापासून पुढील सात दिवसांची मुदतवाढ लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र AIC of India Ltd. यांनी त्यांच्या क्लस्टरमधील जिल्ह्यांसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भारत सरकारने सर्व अधिसूचित जिल्ह्यांमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी नोंदणीची मुदत वाढविण्यास मान्यता दिली असून वाढीव कालावधीत होणाऱ्या नोंदणीसाठी केंद्राचा प्रीमियम वाटा देय राहणार आहे.
वाढीव मुदतीत नैतिक जोखीम टाळण्यासाठी संचालन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त पत्र शेतकर्यांचा समावेश व्हावा यासाठी राज्य सरकारने ही माहिती सर्व नोंदणी केंद्रांना आणि माध्यमांना तात्काळ पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.







