मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. १६ जुन २०२१
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची शिवसेना भवनासमोर जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. त्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सज्जड इशारा दिला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
शिवसेना भवनासमोर सेना-भाजपमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी एका टिव्ही चॅनेलशी संवाद साधला. मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर जशास तसे उत्तर दिलं जाईल. पण भाजपच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा राणेंनी दिला
निलेश राणे यांच्या वक्तव्यामूळे शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबई महानगरपालिका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे मुंबईतल्या शिवसेना व भाजप राड्याला निवडणूकीच्या राजकारणाची ही किनार असू शकते.
बातमी नक्की शेअर करा