पुणे प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२५
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दि. १५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही तारीख जाहीर झाल्यापासून इच्छुकांच्या आणि उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणार्यांत उत्साह तसेच उत्सुकतेचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सदर प्रतिनिधीने नवी पेठ-पर्वती या प्रभागाचा दौरा केला असता त्यांनी एकच नाव प्रामुख्याने घेतले.
यावेळी नागरिकांच्या प्रतिक्रिया, त्यांची मते, त्यांचा मूड लक्षात घेणे हा दृष्टिकोन लक्षात ठेवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे बहुतांश लोकांच्या तोंडी अशोक हरणावळ यांचेच नाव होते. आताची परिस्थिती जी नागरिकांच्या बोलण्यातून लक्षात आली ती म्हणजे गेल्या पाच वर्षांत पर्वतीदर्शन प्रभागात विकासकामे, नागरिकांच्या सोयीसुविधा याबाबत कमालीचे औदासिन्य आहे. जो प्रभाग या पाच वर्षांपूर्वी नीटनेटका, स्वच्छ आणि सोयी सुविधांनी युक्त असा होता त्यास बकालपणा आला आहे असे नागरिक नाराजी आणि संताप अश्या संमिश्र भावनांनी म्हणाले.
हे सांगत असतानाच त्यांनी त्या आधीच्या मागील दहा वर्षांत वेगाने झालेला विकास अधोरेखित केला. यावेळी त्यांच्या तोंडी एकच नाव होते, अशोक हरणावळ यांचे! अशोक हरणावळ यांनी परिसरातील रस्ते तयार करणे, गटारांची, नाल्यांची साफसफाई या कामांबरोबरच प्रभागाच्या सुशोभीकरणाचेही ध्यान ठेवले असाच सूर सर्वांचा होता. एका नागरिकाने तर भरभरून हरणावळ यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी आमच्या परिसराच्या विकासाची घोडदौड जोमात सुरू होती. परिसराचं रूप लक्षणीयरीत्या पालटत होतं. बाहेरची कोणीही व्यक्ती आमच्या परिसरात आली तर येथील घरे, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, नीटनेटकेपणा, सर्वांमध्ये असलेला एकोपा आणि जिव्हाळा पाहून थक्क होत असे. कारण, गेल्या पन्नास वर्षांत पर्वतीदर्शन परिसरात जेवढी विकासकामे झाली नव्हती तेवढी विकासकामे अशोक हरणावळांच्या फक्त त्या दहा वर्षांच्या कार्यकाळात चौफेर झाली.”
दुसर्या एका नागरिकाने तर त्यांच्या विकासकामांचा पाढाच आमच्यासमोर वाचला. “महाराष्ट्रातील पहिले हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन सारसबागेसमोर अशोक भाऊंनी उभं केलं. त्यांनी परिसरातील सर्वसामान्य महिलांना अल्पदरात आरोग्यसेवा मिळावी म्हणून राजमाता जिजाऊ प्रसूतीगृहाची निर्मिती केली, गोल दवाखान्याच्या ठिकाणी अतिशय सुंदर स्व.बाळासाहेब ठाकरे दवाखाना महापालिकेतर्फे सुरु केला, ज्याच्यात डायलिसिस तसेच नेत्रतपासणीची सुविधा आहे. त्यांनी क्रिकेट खेळाडूंकरिता पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमचे नूतनीकरण करुन आकर्षक मैदान बनविले, प्रभागातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसवून पुतळ्याचे सुशोभिकरण केले!” असं हे गृहस्थ अभिमानाने म्हणाले.
त्या उलट इतरांच्या बाबतीत मात्र या नागरिकांचा नाराजीचा आणि नकारात्मकच सूर ऐकायला मिळाला. परिसरात नियमितपणे हरणावळांच्या काळी होणारा विकास लक्षणीयरित्या मंदावला असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
या सर्व गोष्टींचा आढावा घेता निष्कर्ष असाच निघतो की नवी पेठ – पर्वती या प्रभाग क्रमांक २७ मध्ये अशोक हरणावळ यांचीच हवा आहे. नागरिकांच्या मनात हे एकच नाव असल्याचे प्रत्यंतर जवळ जवळ सर्व ठिकाणी आले.






