पुणे प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२५
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, निवडणुकीचे वातावरण सर्वत्र तापू लागले आहे. याच संदर्भात प्रभाग क्र. ३६ (अ) अर्थात सहकारनगर – पद्मावती येथील नागरिकांशी आम्ही संवाद साधला.
आतापर्यंतची विकासकामे, नागरिकांसाठीच्या सार्वजनिक व्यवस्था आणि इतर बर्याच विषयांवर नागरिकांशी बोलणे झाले. या दरम्यान अधिकाधिक लोकांच्या तोंडी एकच नाव ऐकायला मिळाले, ते म्हणजे सुभाष जगताप!
तळजाई परिसराला निसर्गरम्य बनविण्यात सुभाष जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच हा परिसर अधिकाधिक लोकांना आकर्षित करतो आहे असे प्रांजळ मत नागरिकांनी व्यक्त केले.
शिवाय परिसरातील महिलांसाठी, अर्थात सुभाष जगताप ज्यांना ‘लाडक्या बहिणी’ समजतात, खास त्यांच्यासाठीही विविध उपक्रम ते राबवित असतात असे समजले. नुकताच त्यांनी महिलांना अतिप्रिय असणारा ‘होम मिनिस्टर’ अर्थात ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम आणि त्याबरोबरच लकी ड्रॉ आयोजित केला होता. यात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. विजेत्या महिलांना भरघोस बक्षिसे देण्यात आली. तसेच या ‘लाडक्या बहीणींसाठी’ त्यांनी कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा, तुळजाभवानी आणि येरमाळा मोफत दर्शन यात्रा आयोजित केली होती. या यात्रेतही हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. “आम्हाला खूप समाधान लाभले आणि आनंद झाला” असे एका भगिनीने आवर्जून सांगितले.
“या सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच प्रभागाच्या विकासासाठी ते सदैव तत्पर असतात. आमच्या अडीअडचणी सोडविण्यास ते कायम प्राधान्य देतात. प्रभागातील रस्ते, स्ट्रीट लाईट्सचे काम त्यांच्या कार्यकाळात अतिशय सुंदररित्या झाले आहे. त्यांच्यामुळेच तळजाईसह सारा प्रभाग आज आकर्षक बनला आहे” असे एक वृद्ध नागरिक सदर प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
या भेटीत एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे या प्रभागातील जनता सुभाष जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तेच परिसरातील नागरिकांची आणि विशेषतः महिलांची अर्थात लाडक्या बहीणींची प्रथम पसंती आहेत!






