DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंबईत सत्तेसाठी थरार! सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर!

ठाकरे बंधूंची कडवी झुंज.

DD News Marathi by DD News Marathi
January 16, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मुंबईत सत्तेसाठी थरार! सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ जानेवारी २०२६

मुंबई महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या अर्ध्या तासात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून भाजप ११ जागांवर पुढे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना १० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीला एकूण २१ जागांवर सुरुवातीची आघाडी मिळाल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी देखील महायुतीला कडवी टक्कर दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष १४ जागांवर आघाडीवर असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६ जागांवर पुढे आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण २० जागांवर आघाडी मिळाल्याचे सुरुवातीच्या कलांवरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसनेही ५ जागांवर खाते उघडत आपली उपस्थिती दाखवून दिली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक : राज्याचे लक्ष निकालाकडे

गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज होणाऱ्या निकालाकडे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ प्रभागांमध्ये सुमारे १ हजार ७०० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढली; संध्याकाळपर्यंत केंद्रांवर रांगा

गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ६.९८ टक्के मतदान झाले होते. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ही टक्केवारी १७.७३ टक्क्यांपर्यंत पोहोचली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदान ४१ टक्क्यांपर्यंत वाढले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदार मतदान केंद्रांवर दाखल होत होते. अनेक ठिकाणी रांगा लागल्याने साडेपाचनंतरही आतमध्ये मतदान सुरू होते.

एग्झिट पोलचा अंदाज : महायुतीकडे सत्तेची चावी?

दरम्यान, एग्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीचे आव्हान मोडून काढत भाजप–शिवसेना महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत आहेत. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’च्या एग्झिट पोलनुसार, मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी महायुतीला १३१ ते १५१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीला मर्यादित यश, काँग्रेस-वंचित व इतरांचाही प्रभाव

एग्झिट पोलनुसार, ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस-वंचित आघाडीला १२ ते १६, तर इतर पक्षांना ६ ते १२ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

निकालाकडे उत्सुकता शिगेला; मुंबईचा कारभार कोणाच्या हाती?

सुरुवातीचे कल, एग्झिट पोलचे अंदाज आणि मतमोजणीतील चढ-उतार पाहता मुंबई महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम निकालात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadanavis#EkanathShinde#Mahayuti#UddhavThackeray
Previous Post

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

Next Post

पुण्यात सत्तेसाठी आज निर्णायक लढत!

Next Post
मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभागात भाजपची कसोटी!

पुण्यात सत्तेसाठी आज निर्णायक लढत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.