DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; एका व्यासपीठावरून होणार राजकीय गर्जना

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर चित्र कुठे बदललं?

DD News Marathi by DD News Marathi
January 21, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; एका व्यासपीठावरून होणार राजकीय गर्जना

मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२६

यंदाची मुंबई महानगरपालिका निवडणूक मोठ्या प्रमाणात ठाकरे बंधूंच्या भूमिकांभोवतीच फिरताना दिसली. सत्ता मिळवण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही यश आलं नसलं, तरी संभाव्य युतीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन भावांकडे लागून राहिलं होतं. निवडणूक प्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संयुक्त कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मंगळवारी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ स्मरणाचा नसून विचारांचा आणि दिशादर्शक ठरेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने, या व्यासपीठावरून निवडणूक निकालांवर आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर भाष्य होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहार भवन वादात नवा राजकीय ट्विस्ट

मुंबईत बिहार भवन उभारण्यावरून सुरू असलेल्या वादात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नेही भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बिहार भवनविरोधातील भूमिका राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा आरोप रिपाइं (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

मुंबईत बिहार भवन तसेच झारखंड भवन उभारण्यास विरोध करणे हे संविधानाच्या चौकटीबाहेर असल्याचे सांगत, आठवले यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. मनसेने सोमवारी मुंबईत बिहार भवन उभारू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मंगळवारी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, या मुद्द्यावर पुढील काही दिवसांत राजकारण अधिक रंगण्याची शक्यता आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BalasahebThackeray#RajThackeray#ShanmukhanandHall#UddhavThackeray
Previous Post

“तुम्ही फक्त दहशत निर्माण करा! शस्त्रं-पैसा माझा!”

Next Post

वडगाव–मोरगाव गटात सौ. रोहिणी संदीप कदम यांची प्रचारात आघाडी!

Next Post
वडगाव–मोरगाव गटात सौ. रोहिणी संदीप कदम यांची प्रचारात आघाडी!

वडगाव–मोरगाव गटात सौ. रोहिणी संदीप कदम यांची प्रचारात आघाडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
चार दिवसांपूर्वीच दादांनी दिला होता नियतीचा इशारा…!

चार दिवसांपूर्वीच दादांनी दिला होता नियतीचा इशारा…!

January 29, 2026
“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

January 28, 2026
अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

January 28, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.