कोल्हापुर प्रतिनिधीः
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील पावरफुल्ल नेते अनिल देशमुख यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित १० ठिकाणी आज सकाळी सीबीआय ने छापा टाकला आहे. त्यामूळे अनिल देशमुख यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा सरकारचा डाव असल्याचा टिका केली. आज काल सीबीआय व ईडी यांचा वापर केंद्र सरकार राजकीय षडयंत्र राबविण्यासाठी करित असल्याचा ही आरोप त्यांनी यावेळी केला.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री होताच त्यांनी जस्टिस लोया हत्येचा तपास करू सांगितलं, भीमा कोरेगाव दंगलीच्या सूत्रधारांचा शोध सुरू केला, सुशांत सिंग प्रकरणात अमेरिकेतून सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना उघडे पाडले व महाराष्ट्रात सीबीआयला चौकशीआधी परवानगीची अट टाकायला लावली या कारणांमूळे अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय धाड टाकण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत.