DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

DD News Marathi by DD News Marathi
March 4, 2026
in महाराष्ट्र
0
  • पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधर
    डॉ. योगेश म्हसे यांची मुंबईत बदली
    पिंपरी ः पुढारी वृत्तसेवा
    पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत ते सध्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर, सध्याचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. बदलीसंदर्भातील आदेश राज्य शासनाकडून बुधवार (दि. ४) सायंकाळी काढण्यात आला.

पीएमआरडीएच्या आयुक्तपदाचा पदभार डॉ. म्हसे यांनी तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते जून 2024 मध्ये स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी पीएमआरडीएच्या अनेक प्रकल्पांना गती दिली. सेक्टर 12 येथील गृहप्रकल्पांतील त्रुटीबाबत स्ट्रक्चरल ऑडिट, मेट्रोच्या संथ कामांना गती देण्यासाठी कंत्राटदार कंपनीला नोटीस, अनधिकृत हॉटेल्स व होर्डिंगवर कारवाई यासोबतच अनधिकृत बांधकामांवर फौजदारी गुन्हे दाखल केले.

दरम्यान, आता राज्य शासनाच्या आदेशानुसार डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. चौधरी यांनी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांना आता पुण्यातील पीएमआरडीए आयुक्त या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, प्रस्तावित रिंग रोड, माण-हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो वेळेत धावणे, पीएमआरडीएचे गृहप्रकल्प, इंद्रायणी, पवना आणि मूळा नदीसुधार प्रकल्प, 20 नगररचना योजना या कामांचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.