ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनास कंपन्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
पिंपरी
पॉवर ट्रान्समिशन, प्रिसीजन ग्राइंडिंग आणि गिअर उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स नुकतेच येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण व इतर औद्योगिक कंपन्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो उद्योजकांनी आणि कंपन्यांनी याला भेटी दिल्या.
अमेरिकन गिअर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AGMA) यांच्या पाठबळासह होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन नामवंत औद्योगिक नेत्यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिक माहिती देताना रघुनाथ जी., संचालक, व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले की, हे प्रदर्शन उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि उद्योगतज्ज्ञांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ ठरले आहे. देशातील विविध भागातून, महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मोटार गेअर व त्या संबंधित कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
या प्रदर्शनात APAR Industries Limited, Burri India Pvt Ltd, EMAG India Pvt Ltd, Liebherr Machine Tools India Pvt Ltd, Mitutoyo South Asia Pvt Ltd, PMT Machines Limited, Tyrolit India Superabrasive Tools Pvt Ltd, UCAM Pvt Ltd यांसह अनेक आघाडीच्या भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यामुळे देशातील विविध कंपन्यांना या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.
EV ड्राइव्हट्रेन, स्मार्ट फॅक्टरी, संरक्षण प्रणाली, नवीकरणीय ऊर्जा आणि औद्योगिक ऑटोमेशन प्रदर्शनामध्ये पाहण्यास आणि तंत्रज्ञान पाहण्यास मिळाले. मोबाईल, संरक्षण, रेल्वे, एअरोस्पेस आणि ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑटोमेशन, इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकासामुळे उच्च कार्यक्षम ट्रान्समिशन सिस्टीम्सची मागणी वाढत असल्याचे देखील रघुनाथ यांनी सांगितले


