पिंपरी, प्रतिनिधी :
निगडी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देहू ग्रामपंचायतचे माजी सभापती गोपाळशेठ उर्फ आप्पासाहेब काळोखे यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ‘यमूनानगर भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक उत्तम केंदळे, बापू घोलप, अर्चना कारंडे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक विजयकुमार जयशेट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, हवेली पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळोखे, माजी नगरसेवक सचिन चिखले, राजाभाऊ गोलांडे, गणेश काळोखे, पांडुरंग काळोखे, भानूदास काळोखे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ नजन, राहूल जाधव, ज्ञानेश्वर बिराजदार, विठ्ठल मंदिरचे अध्यक्ष अंकुश जगदाळे, नारायण पाटील आदी उपस्थित होते
प्रास्ताविक शोभा घोडके यांनी, सन्मानपत्राचे वाचन सुनिता सुर्यवंशी यांनी, सूत्रसंचालन दीपक मुगावे यांनी, तर आभार नरसिंग माने यांनी मानले.

