पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १६ जुन २०२१
नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ निता ढमाले यांनी आज राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन मराठा आरक्षण संबंधित बाबीवर चर्चा केली. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण कसे देता येईल यावर सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास SEBC उमेदवारांना EWS या प्रवर्गात समाविष्ट करण्यास सांगितले आहे. परंतु SEBC आरक्षण हे १३% होते. EWS आरक्षण हे 10% असल्या कारणाने मराठा समाजातील 3% विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच काही जाहिरातींमध्ये SEBC उमेदवारांचा समावेश EWS या प्रवर्गात केल्यामुळे मूळच्या EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तर काही जाहिरातींमध्ये सुरुवातीपासूनच EWS हे आरक्षणच नव्हते, त्या परीक्षांबाबत उमेदवारांच्या मनात संभ्रमाची परिस्थिती आहे. या सर्व गोष्टींमुळे अन्याय झालेले विद्यार्थी पुन्हा न्यायालयात जातील याची शक्यता नाकारता येणार नाही, व या न्यायालयीन प्रक्रियेमुळे भविष्यात सर्वच परीक्षार्थी उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे.
तरी आपण स्वतः या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वच समाजाला योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळी सौ निता ढमाले यांनी या भेटीवेळी छत्रपती उदयन महाराज यांच्याकडे केली.
बातमी नक्की शेअर करा