यवतमाळ प्रतिनिधीः
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सर्वांना धक्का देणारी घटना घडली आहे. सध्या लॅाकडाऊन मूळे सर्वत्र दारुची दुकाने बंद आहेत. मात्र, दारुची इच्छा भागविण्यासाठी चक्क सॅनिटायझर प्यायल्याने पाच जणांचा मुत्यू झालाचा नातेवाईकांचं म्हणणं आहे.
या पाच जणांमध्ये, दत्ता लांजेवार, गणेश नांदेकर, सुनिल ढेंगळे, नूतन पाथरटकर व संतोष मेहर यांचा समावेश आहे. या पाच ही व्यक्ती दारुची तल्लफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायल्यानेच मुत्यूमुखी पडल्याचे निर्दशनास आले आहे. तेंव्हा, या घटनेमूळे महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे.
बातमी नक्की शेअर करा