पुणे प्रतिनिधी : डीडी न्यूज मराठी
दि.22 जून 2021
काल पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .
करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा उद्घाटन समारंभ हा शहराध्यक्षांनी आयोजित केला होता. याबाबत संबंधित महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्यावतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.अनिल जाधव,मा.सर्वजित बनसोडे,पुणे शहर अध्यक्ष मूनवर कुरेशी,कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर,उपाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड,बाबासाहेब वाघमारे,महासचिव ऍड.अरविंद तायडे,जितेंद्र जाधव,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,प्रवक्ते गौरव जाधव,संघटक विनोद शिंदे,सदस्य सागर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये आंदोलन करण्यात आले. व यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पुणे शहरातील आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते