DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुरंदर तालुक्यात गुंजवणी पाईपलाईनचे काम जोरात सुरू

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट लवकरच पुर्णत्वाकडे जातोय

DD News Marathi by DD News Marathi
June 25, 2021
in ताज्या बातम्या
0
पुरंदर तालुक्यात गुंजवणी पाईपलाईनचे काम जोरात सुरू

सासवड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. २५ जुन २०२१

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुंजवणी प्रकल्पाचे काम भोर वेल्ह्यात सुरू केल्यानंतर आता पुरंदर तालुक्यातही पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात जलसंपदा विभागाशी चर्चा करून शिवतारे यांनी तिन्ही तालुक्यात पाईपलाईनचे काम सुरू केल्यास योजना लवकर पूर्ण करता येईल असे सुचवित पुरंदर तालुक्यातही लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार तालुक्याची हद्द सुरू होत असलेल्या तोंडल गावापासून आज कामाला सुरुवात करण्यात आली.

याबाबत बोलताना माजी सभापती अर्चना जाधव म्हणाल्या, तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब शिवतारे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. गुंजवणी हा देशातील पहिला बंद जलवाहिनी असलेला प्रकल्प आहे. शिवतारे यांच्या संकल्पनेतून ही योजना आकार घेत असून राज्यासहित देशपातळीवर सुद्धा हे मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. दोन्ही सरकारांनी यापुढील काळात प्रवाही कालवा पद्धत बंद करून जलवाहिनीचे धोरण स्विकारले आहे. ही योजना पुरंदर तालुक्यासाठी कल्याणकारी ठरणार असून तालुक्याचे भविष्य त्यातून साकारले जाणार आहे असेही जाधव म्हणाल्या.

त्या संघर्षांतही शिवतारे जिंकतील

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुंजवणीसाठी केलेला संघर्ष जीवावर बेतला होता. किडनीच्या आजारानं त्यांना घेरलं असतानाही त्यांनी गुंजवणीसाठी मोठा लढा दिला. कोर्टकचेऱ्या, विस्थापितांची आंदोलनं, प्रतिस्पर्ध्यांचा छुपा विरोध अशा सगळ्यांना अंगावर घेत शिवतारे यांनी धरण पूर्ण केलं. निवडणुकीत पराभूत झाल्यावरही शब्दाला जागत पाईपलाईनचे काम मार्गी लावले. पण कौटुंबिक कलहाने त्यांना पुन्हा घेरलं. ब्रीच कँडी मध्ये पुन्हा त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ते त्यावरही मात करतील असा विश्वास त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: गुंजवणी पाईपलाईनपुणेपुरंदरविजय शिवतारेविजय शिवतारे आमरण उपोषणविजय शिवतारे ड्रिम प्रोजेक्टशिवसेनासासवड
Previous Post

उपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक !

Next Post

शरद पवार व विजय शिवतारे या दोन व्यक्ती नव्हे चमत्कार होय: कोण म्हणाले ?

Next Post
शरद पवार व विजय शिवतारे या दोन व्यक्ती नव्हे चमत्कार होय: कोण म्हणाले ?

शरद पवार व विजय शिवतारे या दोन व्यक्ती नव्हे चमत्कार होय: कोण म्हणाले ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.