मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. २६ जुन २०२१
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून ब्रीच कँडी हॅास्पिटल येथे उपचार सुरु आहेत. याच हॅास्पिटलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ही उपचार झाले आहेत व अधुन मधून ते सुरु असतात. या दोघांवर उपचार करणारे सिनियर डॉक्टर्स हे एकच आहेत. त्यामूळे या दोघांवर उपचार केलेल्या डॉक्टर्सनी त्यांच्या सकारात्मकतेचे आणि रोग प्रतिकारशक्तीचे विजय शिवतारे यांच्याकडे विशेष कौतूक केले आहे.
शरद पवार व विजय शिवतारे हे दोघेही अतिशय जीवघेण्या आजाराला तोंड देऊन त्यातून सही सलामत बाहेर आले आहेत. या दोघांची सकारात्मक मानसिकता, स्वतःवरील आत्मविश्वास, स्टाँग रोग प्रतिकारशक्ती, प्रभावी इच्छाशक्ती आणि दुर्दर आजारातून बरे होणे हा एक चमत्कार असल्याचे ब्रीच कँडीचे सिनियर डॉक्टर लक्ष्मण व डॉक्टर भट्टाचार्य याचे मत आहे. या दोन्ही डॉक्टर्सना असे वाटते की शरद पवार व विजय शिवतारे या व्यक्ती नसून त्या एक प्रकारचा चमत्कारच आहेत.
ब्रीच कॅन्डीचे दोन डॉक्टर्स विजय शिवतारे यांना काय म्हणाले, जसेच्या तसे.
शरद पवार जी और विजय शिवतारे जी ये दोनों इंसान नहीं चमत्कार हैं.
-सिनियर डॉ.लक्ष्मण सर आणि डॉ.भट्टाचार्य सर
ब्रीच कँडी हॉस्पिटल
मुंबई
तेंव्हा, शरद पवार आणि विजय शिवतारे यांचे जीवघेण्या आजारातून बाहेर येणे हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या रोगप्रतिकार शक्तीचे जगविख्यात अशा ब्रीच कँडी हॅास्पिटलच्या ख्यातनाम डॉक्टर्सनी कौतूक करुन दाद देणे म्हणजे मरणाला ही शरण न जाणारी ही व्यक्तिमत्वे आहेत असेच म्हणावे लागेल.