सासवड प्रतिनिधी : डीडी न्यूज मराठी
दि.26 जून 2021
“तो मी नव्हेच” अशी साळसूद भूमिका घेणाऱ्या आमदार संजय जगताप यांचा खरा चेहरा अखेर समोर आला आहे. पुरंदर तालुक्यातील तोंडल येथे सुरू असलेले गुंजवणीच्या पाईपलाईनचे काम बंद करण्यासाठी त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दरडावले. त्यामुळे अवघ्या ४८ तासात पाईपलाईनचे काम बंद करण्यात आले आहे. मला न विचारता काम का चालू केले असा पवित्रा आमदारांनी घेतल्याचे समजते.
मागील चार वर्षांपासून गुंजवणीचे काम लटकावे यासाठी ते पडद्याआडून काम करत होते. तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावत गुंजवणी धरण पूर्ण केले. पुढे पाईपलाईनच्या कामालाही भोर वेल्ह्यात सुरवात झाली. पुरंदर तालुक्यात सुद्धा काम सुरू करण्यासाठी त्यांनी जलसंपदा विभागाशी समन्वय साधला. पुरंदर तालुक्यातील तोंडल या गावात हे काम सुरू करण्यात आले पण त्यामुळे आमदारांचा भलताच जळफळाट झाला आणि त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून काम बंद करायला लावले. अधिकारी वर्गातूनही त्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील काळात हरित लवाद, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, उच्च न्यायालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या याचिकांमागचा बोलावता धनी संजय जगतापच होते हे त्यामुळे आता उघड झाले आहे.
गुंजवणी पाईपलाईनचे तोंडल येथील काम सुरु असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर आज तालुक्यातील शेतकरी व नागरिक यांनी तेथे जाऊन भेट दिली. मात्र, त्यावेळेस या सर्वांना तिथं वेगळेचं चित्र दिसले. काल तोंडल येथे काम सुरु असल्याची सगळीडे बातमी प्रसिद्ध झाली होती, काम सुरु होतं, आज अचानक काम का बंद झाले म्हणून सर्वांनी जाब विचारला.
आमदार साहेब खरंच काही चुकतंय का.
Khup chan