पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. २७ जुन २०२१
नुकतेच दांडेकर पूल, आंबील ओढा येथील पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टीधारकांच्या झोपड्या ऐन पावसाळ्यात बेकायदेशीर पणे तोडण्याचे काम केले होते. यानिमित्त बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांनी त्या सर्व पिडीत कुटूंबांची भेट घेऊन त्यांच्या पाठिशी बसपा शेवटपर्यंत असेल अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी बहुजन समाज पक्षाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी, प्रदेश सचिव सुदीप गायकवाड व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवसांपुर्वी दांडेकर पूल अंबिल ओढा पुणे येथे पुणे महानगरपालिका व केदार असोसिएट्स या बिल्डर कडून ऐन पावसाळ्यामध्ये झोपडपट्टीधारकांच्या कोणतीही पुर्वसुचना न देता बेकायदेशीरपणे झोपड्या तोडण्याचे काम केले. या झोपड्या पाडताना पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे ऐन पावसाळा असल्याने जनतेतून विरोधाचे तीव्र पडसाद उमटले. शासन स्तरावर या सर्व घटनेची माहिती घेऊन कारवाई स्थगित करण्यात आली होती.
आज बहुजन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने हे पुणे शहरात दौ-यानिमित्त पुण्यात आल्यावर बसपाच्या कार्यकर्त्यांनी आंबील ओढा येथील घटनेची त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ येथील पिढीत कुटूंबियांची भेट घेऊन बहुजन समाज पार्टी झोपडपट्टीधारकांचा लढा ताकदीने लढेल अशी ग्वाही यावेळी दिली.