DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

न्यु कोपरे गावातील वंचित कुटूंबांच्या पुनर्वसनासाठी युक्रांदची जोरदार निदर्शने

वंचितांच्या हक्काच्या घरासाठी युक्रांदचा सत्याग्रह

DD News Marathi by DD News Marathi
July 5, 2021
in ताज्या बातम्या
0
न्यु कोपरे गावातील वंचित कुटूंबांच्या पुनर्वसनासाठी युक्रांदची जोरदार निदर्शने
पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०५ जुलै २०२१
न्यु कोपरे गावच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वंचित राहिलेल्या कुटूंबांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ५ जुलै रोजी युवक क्रांती दलाच्या वतीने कर्वेनगर ( आंबेडकर चौक )येथील काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटसमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले. ‘ हक्काच्या घरांसाठी सत्याग्रह ‘ असे या आंदोलनाचे नाव होते.
संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, सचिन पांडूळे, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले,यल्लाप्पा धोत्रे, नंदू शेळके, ललित मुथा, कुमार गायकवाड आणि पुनर्वसनापासून वंचित नागरीक आंदोलनात सहभागी झाले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
न्यु कोपरे गावातील ८८ वंचित कुटूंबांचे पुनर्वसन २००१ सालापासून झालेले नाही. २०१६ साली ह्या वंचित कुटूंबांनी युवक क्रांती दलाकडे यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यावेळी विकसक संजय काकडे यांनी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना भेटून पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. काकडे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अखेर १७ एप्रिल २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंत युवक क्रांती दलाने रस्त्यावर उतरून सत्याग्रही आंदोलने केली. ६ एप्रिल २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस डॉ. सप्तर्षी, युक्रांदचे पदाधिकारी आणि विकसक सुर्यकांत काकडे ( संजय काकडे यांचे बंधू ) हजर होते. या बैठकीत काकडे यांनी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८८ वंचित कुटूंबांची पुरावे असलेली कागदपत्रे युवक क्रांती दलाने सादर केली.
या कागदपत्रांची छाननी करून जानेवारी २०२० मध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वंचित कुटूंबांचा अधिकार मान्य केला आणि विकसक काकडे यांना नोटीस बजावली. जानेवारी २०२० पासून आजपर्यंत वंचित कुटूंबांची पुनर्वसन प्रक्रीया सुरू झालेली नाही. या अन्यायाबदद्ल विकसक काकडे यांच्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. वंचित ८८ कुटूंबांची पुनर्वसन प्रक्रीया सुरू करावी, अशी या आंदोलनाची मागणी आहे.
बातमी नक्की शेअर करा
Previous Post

शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद दौरा रद्द – ना. जयंत पाटील

Next Post

एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Next Post
एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.