DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या, निबंध स्पर्धेत महिलाराज

सोलापूर सोशल फाऊंडेशन चा तीसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

DD News Marathi by DD News Marathi
July 9, 2021
in मनोरंजन
0
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या, निबंध स्पर्धेत महिलाराज

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०९ जुलै २०२१

सोलापूर सोशल फाउंडेशनने तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध आणि छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून निबंध स्पर्धेतील सहा विजेत्यांपैकी सहाही विजेत्या महिला आहेत. विशेष म्हणजे छायाचित्र स्पर्धेत मात्र एकाही महिलेला पुरस्कार मिळालेला नाही. सोलापूरची पर्यटन वैशिष्ट्ये असा या दोन्ही स्पर्धांचा विषय होता. या दोन्ही स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
निबंध स्पर्धेचा पहिला पाच हजार रुपयांचा पुरस्कार वैष्णवी अण्णासाहेब गरड आणि सुरेखा महादेव केवटे यांना विभागून देण्यात आला आहे. द्वितीय क्रमांकाचा तीन हजार रुपयांचा पुरस्कार आनंदी गजानन काळे यांनी पटकावला आहे. तर दोन हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार श्‍वेता रावसाहेब पालकर यांनी मिळवला आहे. एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार पूजा दिलीप पाटील आणि दीपाली गुरुनाथ बोराळे यांना देण्यात आला आहे.

याच निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचा पाच हजार रुपयांचा पहिला पुरस्कार प्रवीण गायकवाड आणि राहुल गोडसे यांना मिळाला. अमोल मिस्कीन यांनी तीन हजार रुपयांचा दुसर्‍या क्रमांकाचा तर महेश बनसोडे याने दोन हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार पटकावला. निशांत वाडकर आणि शुभम राजमाने यांना एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ देण्यात आले, अशी माहिती मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी दिली.

हा पुस्कार वितरण समारंभ सोलापूर सोशल फाउंडेशनचे ब्रँड ऍम्बेसिडर राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संचालक मयुरी वाघमारे-शिवगुंडे, रवींद्र मिनीयार, सल्लागार प्रा. नरेंद्र काटीकर, अमित जैन, संकेत जेसुदास हे उपस्थित होते. या दोन्ही स्पर्धांचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. नरेंद्र काटीकर यांनी काम पाहिले. या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून बदिउज्ज्मा बिराजदार, प्रा. प्रशांत चाबुकस्वार आणि प्रा. गणेश देशपांडे यांनी काम पाहिले. छायाचित्र स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवानंद हिरेमठ यांनी काम पाहिले.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

पडळकरांच्या बगलबच्यानो, घरात घुसून मारु : स्मिता देशमुख

Next Post

२३ गावांच्या प्रारुप डिपीला मंजुरी : हरकती सुचना मागविणार

Next Post
२३ गावांच्या प्रारुप डिपीला मंजुरी : हरकती सुचना मागविणार

२३ गावांच्या प्रारुप डिपीला मंजुरी : हरकती सुचना मागविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.