DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अकोला वासुद येथे वृक्षारोपणा संदर्भात गावातील युवकांनी राबविला अभिनव उपक्रम

तब्बल २१ शे वृक्षांची लागवड : समाजातील सर्व स्तरातून होतंय कौतूक

DD News Marathi by DD News Marathi
August 15, 2021
in प्रेरणादायी
0
अकोला वासुद येथे वृक्षारोपणा संदर्भात गावातील युवकांनी राबविला अभिनव उपक्रम

सांगोला प्रतिनिधी : डीडी न्युज मराठी

दि. १५ ऑगस्ट २०२१

अकोला वासुद हे सांगोला तालुक्यातील एक महत्वपुर्ण गाव होय. अनेक गोष्टींमध्ये हे गाव सदैव पुढाकार घेऊन काही उपक्रम साकारत असते. वृक्षारोपणा संदर्भात असाच एक आगळावेगळा व नाविन्यपुर्ण उपक्रम येथील युवकांनी ग्रामस्थांच्या मदतीने साकारला आहे. ‘ग्रामविकास फाऊंडेशन’तर्फे ‘माझे गाव, माझे झाड’ अभियाना अंतर्गत गावामध्ये २१ शे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या युवकांनी मिळून हा उपक्रम गावात राबविला आहे. कोणी प्रशासकीय अधिकारी, कोणी डॉक्टर, कोणी व्यवसायिक तर कोणी प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील गावाविषयी प्रेम आणि आस्था असणारे युवक आहेत. या युवकांनी मिळून गावाच्या सर्वांगिण हिताकरिता सर्वात आधी ‘ग्रामविकास फाऊंडेशन’ सुरु केले.

या फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात पहिला उपक्रम हाती घेतला तो म्हणजे, गावातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वृक्षारोपण करणे. ‘माझे गाव, माझे झाड’ ही टॅगलाईन देऊन फाऊंडेशनने पहिल्या टप्यात तब्बल २१ शे रोपांचे वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यासाठी या सर्व युवकांनी एकत्रित येऊन स्वतः आर्थिक मदत गोळा केली. त्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने आणखी निधी उभा केला. युवकांचा उत्साह आणि काम करण्याची तळमळ पाहून जवळपास लाखो रुपयेंचा निधी उभा राहिला. त्यातून मग, २१ शे रोपे खरेदी केली. विशेष म्हणजे, ही सर्व रोपे देशी आहेत. ज्यामध्ये चिंच, आंबा, शिसव, अर्जुन, अंजन, कांचन, आवळा, करंज, पिंपळ, कडुनिंब, काशिद, शिताफळ, गुलमोहर, वड, जांभुळ व उंबर या देशी वृक्षांचा समावेश आहे. शिवाय, ही लावण्यात आलेली रोपे खराब होऊ नयेत किंवा जनावरांपसून त्याचे संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक रोपास खास ट्रिगार्ड बनविण्यात आली आहेत.

या उपक्रमामध्ये गावातील नागरिकांचा फार मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यांना झाडांचे पालकत्व देण्यात आले. त्यामूळे त्या झाडाची जबाबदारी त्या त्या व्यक्तींवर असणार आहे. या उपक्रमास गावातील लोकांनी पैशाच्या स्वरूपात, जेसीबी, ट्रॅक्टर आणि खते यांच्या स्वरूपात भरीव मदत केली. या अभिनव उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून जोरदार कौतूक होत आहे.

अकोला गावचे सुपुत्र व ठाणे येथे तहसीलदार पदावर कार्यरत असलेले आकाश लिगाडे यांनी या उपक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

दुकानांच्या वेळा वाढवून द्या. व्यापाऱ्यांवरील अन्याय आता पुणे शहर भाजप सहन करणार नाही

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई नागणे पाटील यांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदतीचा हात

Next Post
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई नागणे पाटील यांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदतीचा हात

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई नागणे पाटील यांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.