पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १५ ऑगस्ट २०२१
नेहमीच समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्या राजश्रीताई नागणे पाटील यांनी पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून जीवनाश्यक वस्तुंची मदत केली आहे. एक हात मदतीचा आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसांचा या संकल्पनेतून आगळावेगळा उपक्रम राबवित पुरग्रस्तांना लाखमोलाची त्यांनी मदत केली.
चिपळूण, खेड, कोकण, कोल्हापुर, सांगली व कराड येथे महापुर आल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडले होते. महाराष्ट्र आणि देशभरातून या पुरग्रस्तांच्या मदतीकरीता अनेक हात सरसावले. त्यापैकीच एक मदतीचा हात म्हणजे राजश्रीताई नागणे पाटील यांचा होय. राजश्रीताई यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांचा विचार करुन पुणे, सांगोला आणि मुंबई-बोईसर येथे मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला आहे.
कोकण आणि कोल्हापुर परिसराला महापुराचा फटका बसल्याने तेथील नागरिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून राजश्रीताई नागणे पाटील यांनी त्यांना जीवनाश्यक वस्तूची मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी वैष्णवी महिला उन्नती संस्था, राजदत्त फाऊंडेशन व हिंदवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून धान्य आणि जीवनावश्यक वस्तू स्वरूपात तब्बल नऊ टन साहित्य कोकणातील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही मदत पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि वैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई नागणे पाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील, हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास विनायक भाडळे, भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकारी श्वेतल नागणे पाटी, उरळी देवाचीचे माजी सरपंच अनिरुद्ध पाचपुते, युवा उद्योजक सुरज नागणे पाटील, राजेंद्र ओसवाल, मंगल साबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काही क्षणचित्रे