पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १६ ऑगस्ट २०२१
कलाकारांना वेळोवेळी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठया प्रमाणात आयोजन करण्यात येईल. कोरोना महामारीमुळे सर्व कलाकारांचे कला प्रदर्शन अनेक महिने बंद असल्याने आजच्या कार्यक्रमामुळे एकमेकांना भेटून आनंद लुटला ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाची अमृतमहोत्सवी भेट मिळाली असल्याचे मत बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे वतीने विद्यानगर, पुणे येथे चलवादी यांना समाजभूषण पुरस्कार जेष्ठ अभिनेते वसंतराव अवसरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे, साई दरबारचे बबलू दुग्गल, शाहीर राहुल शिंदे, गायक संकल्प गोळे, लावणी कलाकार अलका जगताप, संगीता लाखे, होम मिनिस्टर सादरकर्ते क्रांतीनाना मळेगावकर, बालकलाकार सह्याद्री मळेगावकर, उपाध्यक्ष पी.चंद्रा, मिठू पवार, संजय मगर, राजेश डेव्हिड, हेमा कोरभरी, बाळासाहेब निकाळजे, गणेश गायकवाड, शिल्पा भवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अॅड रेणुका चलवादी यांच्या हस्ते कलाकार मंडळींना अन्नधान्याचे किट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी ग्लोबल ग्रुप पुणेचे संजीव अरोरा यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली यामध्ये पोवाडे ,गोंधळी गीते ,लावणी ,वाघ्यामुरुळी, भारुड ,नृत्य ,गायन आदीचा समावेश होता .चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांचे विमा पॉलिसी फॉर्म, महात्मा फुले शहरी गरीब योजना फॉर्म व रमाई घरकुल आवास योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले तसेच उपस्थित कलाकारांसाठी ग्लोबल हेल्थ केअरच्या वतीने मोफ़त वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याचा लाभ अनेकांनी घेतला.
तसेच कोरोना काळात मदत करणाऱ्या सुजाता कांबळे, मुराद काझी, कुमार पाटोळे, आमिर शेख, यशवंत डोळस यांना कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध पार्श्वगायक चित्रसेन भवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिठू महादेव पवार यांनी विशेष सहकार्य केले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.