सासवड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
६ सप्टेंबर २०२१
विमानतळ संघर्ष समिती ही कुठल्याही गावकऱ्यांनी नेमलेली समिती नाही. त्यामुळे विमानतळविरोधी संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष वगैरे फडतूस पदं लावून मिरवणाऱ्या संतोष हगवणे यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना अक्कल शिकवण्याची गरज नाही. आपली औकात पाहूनच वक्तव्यं करावीत. उगाच कुठेही हगवण करू नये अशा शब्दात संतोष हगवणे या स्वयंघोषित कार्याध्यक्षाची युवासेनेचे पुरंदर तालुका संपर्कप्रमुख मंगेश भिंताडे यांनी खरडपट्टी काढली.
शिवतारे यांनी पारगाव वगळून अन्य सहा गावात विमानतळ करणेबाबत शरद पवारांना लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने हगवणे यांनी ‘या गावाची मक्तेदारी शिवतारेंना दिली आहे का ? असा सवाल केला होता. याबाबत भिंताडे म्हणाले की, विमानतळ व्हावे यासाठी सहा गावातील अनेक शेतकरी इच्छुक आहेत. ते फक्त आपल्याला किती मोबदला मिळतो यावर निर्णय घेणार आहेत. त्यांनी हगवणे यांच्यासारख्या दीडदमडीच्या लोकांना हे काम सोपवलेले नाही. ते यांच्या आंदोलनात सुद्धा कधी उतरत नाहीत. जो व्यक्ती विमानतळासाठी सकारात्मक असतो त्याला घरी जाऊन किंवा इतर मार्गाने हे चोंबडे भंडावून सोडतात. त्यामुळे लोक वाद न घालता जमिनीला काय भाव मिळणार याची वाट बघत आहेत असेही भिंताडे म्हणाले.
श्री. भिंताडे पुढे म्हणाले, लोकांचा विमानतळाला विरोध असेल तर जमिनीचा भाव घोषित झाल्यावर ते तसा निर्णय घेतील. त्यांच्या खाजगी निर्णयात उगाच आपले शेणखाऊ तोंड बुडवू नये. शिवतारे यांनी तालुक्यासाठी काय केले ते आत्ता लोकांना चांगलं समजलं आहे. विमानतळाला विरोधाच्या नावाखाली ज्यांना निवडून दिलं ते आता तालुक्यात करण्यासाठी कामच शिल्लक नाहीत असं सांगत आहेत. हगवणे यांना बुद्धी नावाची गोष्ट असेल तर त्यांनी शिवतारे यांच्यावर टीका करण्यापूर्वी आमदारांच्या या वक्तव्याचा अभ्यास करावा असाही जोडा भिंताडे यांनी हगवणे यांना लगावला.