पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. १७ सप्टेंबर २०२१
येत्या रविवारी गणेश विसर्जन असल्याने पुणे आणि पिपंरी-चिंचवड परिसरात येत्या रविवारी (दि.१९) एकदिवशीय लॅाकडाऊन अर्थातच सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसे आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
माञ, हाँटेल आणि रेस्टाँरट अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी काही कडक निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले. रविवारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच तिन्ही कॅन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्याबाबातच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, त्याबाबत आदेश काही वेळानंतर विभागीय आयुक्त काढणार आहेत. त्यामूळे पुणेकरांना पुन्हा एकदा एकदिवशीय लॅाकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे.