पुणे प्रतिनिधी.
दि. २४ एप्रिल २०२२
स्व.प्रा.यशवंतराव भिमाले उद्यान या नावास काही संस्था व नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करीत आहेत. मात्र, आमचा या उद्यानाच्या नावास कोणताही विरोध नाही. आम्हाला परिसरात शांतता हवी असून परिसरात विकासकामे हवी आहेत. मात्र काही नागरिक सॅलिसबरी पार्क परिसराची नाहक बदनाम करुन परिसराचे वातावरण दुषित करीत आहेत ते त्वरित थांबवावे अशी भूमिका घेत रविवार असून ही स्वंयस्फुर्तीने नागरिक रस्त्यावर उतरले होते. हि आंदोलने त्वरित न थांबल्यास आणखी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशारा ही त्यांनी दिला. त्यामूळे स्व.प्रा.यशवंतराव भिमाले उद्यान या नावास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
पुण्याच्या आयुक्त्यांनी या उद्यानाच्या नावाबाबत सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्याचे सांगितले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी उद्यानास महानगरपालिकेने दिलेले स्व.प्रा.यशवंतराव भिमाले हेच नाव कायमस्वरुपी रहावे म्हणत मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरुन पाठिंबा ही दर्शविला आहे. त्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरातील ९० टक्के नागरिकांनी सह्यांची मोहिम राबवून निवेदन दिले आहे. तेव्हा, उद्यानाच्या नावाबाबतचा हा वाद आता संपला आहे. नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी परिसरात चांगली विकासकामे केली आहेत, भविष्यात ही त्यांच्याकडून आणखी चांगली कामे करण्यासाठी प्रयत्न करुयात.
परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे हे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. स्व. प्रा. यशवंतराव भिमाले उद्यानाच्या नावाला सॅलिसबरी पार्क परिसरातील वेंचेस्टर हाऊस, सिटीवूड, कोजीमेन्शन, शानगंगा, अरिहंत, गिडनीपार्क, यासिनजूग दर्गा, एसडी मिशन कंपाऊंड यासह इतर सोसायटीमधील चेअरमन, प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी नावाला विरोध करण्यापेक्षा विकासकावर भर देण्यात यावा याकरिता आंदोलने केली पाहिजेत. मात्र, झालेल्या विकास कामात आडकाठी आणण्याचे काम काही नागरिक करीत आहेत, हे चुकीचं असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्व.प्रा.यशवंतराव भिमाले उद्यान हे उद्यानास नाव दिले असून त्या नावाबाबत बहुतांशी नागरिकांचे एकमत असल्याने आता या नावाच्या वादावर पडदा पडलेला आहे. तेंव्हा, पुन्हा चुकीच्या पद्धतीने आंदोलन कोणी ही करु नये.
सॅलिसबरी पार्क हा तसा पुणे शहरातील उच्चभ्रू नारिकांचा शांततामय असा परिसर आहे. त्यामूळे परिसराच्या शांततेसाठी सर्वांनी एकत्रित येण्याच आवाहन नागरिकांनी केले.
आम्हाला सॅलिबरी पार्कमध्ये विकास हवा आहे, आमचा कोणत्याही नावाला विरोध नाही. सॅलिसबरी पार्कची बदनामी थांबवा, आम्हाला येथे शांतता हवी आहे अशा आशयाचे हातातील फलक आणि घोषणांनी नागरिकांनी परिसर दणाणून सोडला. आजच्या आंदोलनासाठी स्थानिक रहिवाशी चंद्रकांत वाकणकर, अनिल गुप्ता, मिशल मेहता, दिगांत बंब, नरेंद्र लोढा, रवि दायमा, गौरव ढेरे, जितेंद्र कटारिया, शिवाजी चव्हाण, सय्यद मस्जिद, शाबिर शेख, प्रभाकर कांबळे, श्री.नागोरी, विनोद सोनिग्रा, स्टेला महालिंगम व वर्षा कांकरिया यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नागरिक म्हणाले, “स्व.प्रा.यशवंतराव भिमाले हे प्रकाशक, लेखक व वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचे वनस्पतीशास्त्रातील योगदान अतिशय मोलाचे असे आहे. तेंव्हा, त्यांचा कार्याचा सन्मान म्हणून या उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यात गैर काही नाही. आमचा नावाला विरोध नसून आम्ही येथे होत असलेल्या विकासाच्या बाजूने आहोत.”
फोटो ओळीः सॅलिसबरी पार्क मधील स्व.प्रा.यशवंतराव भिमाले उद्यान हे नाव कायमस्वरुपी रहावे म्हणून नागरिक उत्स्फुर्तपणे नागरिक रस्त्यावर उतरले.