DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘मिताली राज’चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर!

'शाबास मिथू'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2022
in क्रीडा, मनोरंजन
0
‘मिताली राज’चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर!

पुणे प्रतिनिधी :

दि. 20 जून

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार ‘मिताली राज’ हिच्या बायोपिक ‘शाबाश मिथू’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. 15 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार्‍या या चित्रपटात मिताली राजच्या बालपणापासून ते क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 वर्षांची कारकीर्द आहे. तिने अनेक विक्रम मोडीत काढत एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. ट्रेलरची सुरुवात मिताली राजच्या क्रिकेटच्या मैदानावरील चौकार आणि षटकारांनी होते. तापसीने तिच्या सोशल हँडलवर ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हाला नाव माहित आहे, आता मितालीला लीजंड बनवण्यामागील कथा पाहण्यासाठी तयार व्हा. ‘द जेंटलमन्स गेम’ ची नव्याने व्याख्या करणाऱ्या महिलेची कथा तुमच्यासमोर आणताना मलाच सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. ‘शाबास मिथू’ 15 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

अतिशय आकर्षक ट्रेलर

‘शाबास मिथू’ चा ट्रेलर 2 मिनिटे 24 सेकंदांचा आहे. यात मिताली राजचे बालपण ते तिच्या 23 वर्षांच्या आंतरराराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा प्रवास अतिशय सुंदर रीतीने दाखवण्यात आला आहे. यामध्ये काही इमोशनल सीन्सही आहेत. पुरूषांचे वर्चस्व असलेल्या खेळात प्रवेश करणे हे महाकर्मकठिण काम मितालीने शक्य करून दाखवले आहे. तिची जिद्द, चिकाटी आणि कुवत यांचा एकत्र परिणाम म्हणजे तिने मिळवलेले हे यश आहे हे आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येते. मिताली आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंब, समाज यांच्याविरोधात खंबीरपणे उभी ठाकल्याचेही आपल्या लक्षात येते.

हा चित्रपट मिताली राजच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स ड्रामा आहे असे आपण म्हणू शकतो. मितालीने आपल्या तब्बल 23 वर्षांच्या कारकीर्दीत केलेले विक्रम, मिळवलेले विजय नक्कीच अवर्णनीय आहेत. तिने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. अनेक विक्रमही मोडले आहेत. मिताली राजच्या आयुष्यातील यश अपयश या चित्रपटात सुंदर पद्धतीने दाखवले गेले आहे. विजय राज देखील या चित्रपटात तापसीशिवाय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा प्रिया अवेनने लिहिली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

मान्सूनचे होणार दमदार पुनरागमन

Next Post

भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

Next Post
भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.