DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

भरतीसाठीची अधिसूचना सोमवारी जारी झाली

DD News Marathi by DD News Marathi
June 21, 2022
in ताज्या बातम्या
0
भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

पुणे प्रतिनिधि :
दि. 21 जून 2022

‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत लष्करात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठीची अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील आहे. जुलैपासून सैन्याची विविध भरती युनिट्स त्यांच्या स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. उमेदवारांना ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in वर जावे लागेल. नियमित संवर्गाबाबत, चार वर्षांनंतर निवडलेल्या ‘अग्निवीर’ला पुढील 15 वर्षांसाठी नियुक्त करण्यात येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

लष्करातही अग्निवीरांना वर्षभरात 30 सुट्या मिळणार आहेत. अग्निवीरांना कोणताही महागाई भत्ता किंवा लष्करी सेवा वेतन मिळणार नाही. तुम्ही अग्निवीरांच्या भरतीची संपूर्ण अधिसूचना डाउनलोड करू शकता.

लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा यांनी रविवारी सांगितले होते की, अग्निपथ योजने अंतर्गत भरती मेळावे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होतील. डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सुमारे 25,000 जणांचे भरतीचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांची दुसरी तुकडी 23 फेब्रुवारी 2023 च्या सुमारास प्रशिक्षण सुरू करेल. सुमारे 40,000 जवानांच्या निवडीसाठी देशभरात एकूण 83 भरती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे.

हवाई दल आणि नौदलातील भरतीची स्थिती –

रविवारी, तिन्ही सेवांनी अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीला गती देण्याची घोषणा केली. अग्निवीरची नोंदणी प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होणार असल्याचे IAF ने सांगितले. ही प्रक्रिया ऑनलाइन असेल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा 24 जुलैपासून होणार आहे आणि या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण 30 डिसेंबरपर्यंत सुरू होईल असे समजते.

भारतीय नौदलाने सांगितले की, भरती प्रक्रियेचे सर्व काम पूर्ण झाले आहे. याबाबतच्या जाहिराती 25 जूनपर्यंत प्रसिद्ध होतील. 21 नोव्हेंबरपासून पहिली अग्निवीर तुकडी प्रशिक्षण केंद्रात पोहोचण्याची प्रक्रिया सुरू होईल. यात लेडी अग्निवीरांनाही सहभागी होता येईल हे महत्त्वाचे.

दरम्यान, सेवेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ‘अग्नीवीर’ने स्वत:ला मुक्त करण्याची विनंती केली तर ती अमान्य होईल. केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्येच परवानगी दिली जाऊ शकते आणि सक्षम अधिकाऱ्याच्या शिफारशीनंतरच हे केले जाईल.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

‘मिताली राज’चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर!

Next Post

‘नेशन फर्स्ट’ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘योगा डे’ उत्साहात साजरा!

Next Post
‘नेशन फर्स्ट’ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘योगा डे’ उत्साहात साजरा!

'नेशन फर्स्ट' प्री-प्रायमरी स्कूलमध्ये 'योगा डे' उत्साहात साजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.