पुणे प्रतिनिधी, डीडी न्यूज
दि. 22 जून 2022
महामंत्र निरोगी जीवनाचा, संकल्प नित्य योग करण्याचा !
दि. 22 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. योगाचे महत्त्व आज जगाला पटू लागले आहे याचाच हा पुरावा आहे. आपल्या भारत देशाने जगाला दिलेली ही एक अमूल्य भेट आहे.
योगामुळे शरीर, मन व आत्मा एकसंध राहातात असे सिद्ध झाले आहे. शारीरिक व मानसिक संतुलनासाठी योगा अतिशय महत्त्वाची भूमिका बाजवतो. दिवसेंदिवस याचा प्रचार व प्रसार वाढतो आहे. या दिवशी विविध ठिकाणी, शाळा – कॉलेज यांमध्ये, आपआपल्या परिसरात बहुसंख्येने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि ती कायम करण्याचा संकल्पही केला जातो.
याच परंपरेला जपत आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आज बहु-उद्देशीय हॉल, दर्शीनी चौक, मार्केटयार्ड, पुणे ३७ येथे मा. योग गुरु डॉ.प्रमोद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनानुसार मा.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व मा.नगरसेविका.सौ.वंदनाताई भिमाले आणि उपस्थितांनी योगासने केली. योग दिना निमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.