पुणे प्रतिनिधी :
दि. 24 जून 2022
पुण्याच्या कात्रज परिसरातील बाबाजीनगर येथील ‘नेशन फर्स्ट’ या हाय-टेक प्री-स्कूल मध्ये नुकताच प्रतिकात्मक दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. ‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ च्या नामघोषात चिमुकले विद्यार्थी तल्लीन झालेले दिसत होते.
दरवर्षी आळंदी आणि देहू येथून लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पादुका घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वेगवेगळ्या ठिकाणांहून निघणार्या या दिंड्या पुढे एकत्र येऊन पंढरपूरला पोहोचतात. या दिंड्यांचे कौतुक आणि आकर्षण सर्वच वयोगटातील लोकांना असते. याच दिंडीचे प्रतिकात्मक आयोजन ‘नेशन फर्स्ट’ मध्ये केले होते.
कात्रज येथील ‘नेशन फर्स्ट’ हे हाय-टेक पद्धतीने शिक्षण देणारे, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आणि सर्वच थरातील लोकांना परवडेल अशी माफक फी घेणारे प्री-स्कूल आहे. मुलांवर योग्य संस्कार होण्याच्या दृष्टीने आणि त्यांची जडणघडण चांगली व्हावी या हेतूने अभ्यासाशिवाय बरेच चांगले उपक्रम येथे राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ‘प्रतिकात्मक दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.