DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘सरकार कुणाचं’ वरुन वाद आता पोहोचला ‘बाळासाहेब कुणाचे’ पर्यंत!

शिंदे गटाचा 'शिवसेना (बाळासाहेब) नावाने पक्ष स्थापण्याचा विचार

DD News Marathi by DD News Marathi
June 25, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0

मुंबई प्रतिनिधी :

दि. 25 जून 2022

महाराष्ट्रात शिवसेना स्थापनेपासूनच्या 56 वर्षांमधल्या सगळ्यात मोठ्या पेचप्रसंगाला तोंड देते आहे. जवळ जवळ 38 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेकडे आता फक्त 16 ते 17 आमदारच उरले आहेत. यादरम्यान एकीकडे मुंबई येथे शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक तर गुवाहाटी येथे शिंदेंचे समर्थन करणार्‍या बंडखोर आमदारांची व्यूहरचना असा दुहेरी खेळ रंगला आहे.

बाळासाहेबांच्या नावाचा वापर करण्यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. काल व्हर्च्युअल मीटिंग घेतलेले मा. उद्धव ठाकरे आज स्वतः तडकाफडकी दुसरी बैठक घेऊन तिला प्रत्यक्ष हजर राहिले. त्यात त्यांनी हिम्मत असेल तर बंडखोरांनी स्वतःच्या वडिलांचं नाव वापरावं असं म्हटल्याचं समजतं.

या बैठकीत एकूण पाच मुद्यांवर चर्चा झाली आणि त्यातून तीन मुद्द्यांवर एकमत झाल्याचं समजतं. ते तीन मुद्दे असे –

सगळे निर्णय हे मा. उद्धव ठाकरे घेतील. त्यांचा निर्णय अंतिम राहील.

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणालाही वापरता येणार नाही.

कोणत्याही कारवाईचा अधिकार हा मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल.

यापुढे असंही समजतं की स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव वापरण्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी शिवसेनेने आता निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच ‘सरकार कुणाचं’ चा वाद आता ‘बाळासाहेब कुणाचे’ वर येऊन पोहोचल्याची चर्चा सर्वत्र रंगल्याचे दिसते.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

Next Post

गुजरात दंगलींमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सितलवाड यांना अटक

Next Post
गुजरात दंगलींमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सितलवाड यांना अटक

गुजरात दंगलींमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सितलवाड यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.