पुणे प्रतिनिधी :
दि. 30 जून 2022
महाराष्ट्राच्या राजकरणात जबरदस्त घडामोडी सुरू आहेत आणि अंदाजांचा जणू पूर आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर जरी मा. देवेन्द्र फडणविसांच्या रूपाने सध्या दिले जात असले तरी मा. चंद्रकांत पाटील यांच्यासह आणखीही बरीच नावे चर्चेत असल्याचे समजते. त्याबरोबरच उपमुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. यात एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर आहे तर भाजपाचे इतर मान्यवरही या महत्त्वाच्या पदाच्या यादीत सामील आहेत.
बरेच तर्क वितर्क लढविले जात आहेत. त्यात परत शपथविधी कधी होणार याबद्दलही अनेक मते मतांतरे आहेत. सूत्रांच्या महितीनुसार शपथविधी आजच पार पडण्याची शक्यता आहे तर काही तीन तारखेचा हवाला देत आहेत. याचबरोबर नव्या मंत्रिमंडळात कुणा कुणाची वर्णी लागणार हीसुद्धा मोठी उत्सुकता जनतेसमोर आहे.
एक सरकार जाऊन दुसरे सरकार येणे ही घटना बर्याच गोष्टी आपल्याबरोबर घेऊन येते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याच्या महाचर्चा रंगू लागतात. “मी पुन्हा येईन” म्हणणारे मा. देवेंद्र फडणवीस पुन्हा येत असल्याचे दिसत असले तरी सध्याचे महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांचेही नाव चर्चेत असल्याचे समजते.