DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांची जागा कोण घेणार?

कोण असेल नवा चेहरा?

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
देवेंद्र फडणवीसांची जागा कोण घेणार?

मुंबई प्रतिनिधी :

दि. 30 जून 2022

गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा कारभार सांभाळणारे ठाकरे सरकार आता कोसळले आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रात भाजपकडून सत्ता स्थापन केली जाईल. विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून किती प्रभावीपणे काम करता येऊ शकते याचा उत्तम वस्तूपाठ घालून दिला आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे कधी नव्हे इतके विरोधी पक्षनेत्याभोवती केंद्रित राहिले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर तेवढाच तुल्यबळ विरोधी पक्षनेता कोण होऊ शकेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात महाराष्टाचा नव्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. यापूर्वी शिवसेना हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडे अवघे १६ आमदार उरले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीपद गमावलेल्या शिवसेनेवर आता विरोधी पक्षनेतेपदही गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. महाविकास आघाडीत आता ५३ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद आता राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल असे बोलले जात आहे.

ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. त्यामुळे आता विरोधी पक्षात गेल्यानंतरही राष्ट्रवादीचे विधिमंडळातील सर्वोच्च पद हे अजित पवारांकडेच राहील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद गेले तरी अजित पवार यांचे वैयक्तिकरित्या फारसे नुकसान होणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधी पक्षनेता हा एकप्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो, असे राजकारणात म्हटले जाते. या पदाची ताकद आणि प्रभाव काय असू शकतो हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवून दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणे ही त्यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असू शकते. आता अजित पवार विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार का? विरोधी पक्षनेता म्हणून किती प्रभावीपणे काम करणार? हे येणारा काळच स्पष्ट करेल. अजित पवारांनी हे पद न स्वीकारल्यास ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे जाऊ शकते. जयंत पाटील यांनाही सभागृहातील राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मात्र, हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्याइतकी प्रभावी कामगिरी करु शकतात का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#JayantPatil#OppositionLeader
Previous Post

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखीही नावे चर्चेत?

Next Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फायनल?

Next Post
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फायनल?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फायनल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.