DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फायनल?

संभाव्य मंत्रीमंडळही तयार

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फायनल?

मुंबई प्रतिनिधी :
दि. 30 जून 2022

महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत. 36 दिवसात बनलेलं तीन पक्षांचं सरकार अडीच वर्ष चाललं आणि नऊ दिवसात कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहितीही समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदांसह 28 मंत्री असणार आहेत तर शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपदे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. मात्र खातेवाटपाचे हे गणित अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28 मंत्रीपदे असतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात यांची लागू शकते वर्णी

कॅबिनेट मंत्री : देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील, संजय कुटे, डॉ. अशोक उईके / विजयकुमार गावित, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, जयकुमार गोरे, विनय कोरे, जनसुराज्य, परिणय फुके.

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

नितेश राणे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कुल, निलय नाईक, गोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटाकडून यांची नावे असू शकतात :

कॅबिनेट मंत्री : एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, दीपक केसरकर,

राज्यमंत्री : संदीपान भूमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CMofMaharashtra#DeputyCMofMaharashtra#DevendraFadanvis#EkanathShinde
Previous Post

देवेंद्र फडणवीसांची जागा कोण घेणार?

Next Post

महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ राज पुन्हा एकदा झालं नक्की. आज संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ!

Next Post
महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ राज पुन्हा एकदा झालं नक्की. आज संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ!

महाराष्ट्रात 'देवेंद्र' राज पुन्हा एकदा झालं नक्की. आज संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.