मुंबई प्रतिनिधी :
दि. 1 जुलै 2022
महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर आता सगळे चित्र स्पष्ट झाले आहे. मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेले आहेत. भाजपाच्या श्री. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या घोषणेनंतर राजकीय विश्लेषकांमध्ये या निर्णयावरच्या चर्चांना उधाण आले आहे. सर्वांनाच चक्रावून टाकणारा आणि सगळ्यांचे अंदाज मोडीत काढणारा हा निर्णय ठरला आहे. मा. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांना अगदी खात्रीलायकपणे वाटत होते की श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण मा. एकनाथ शिंदेंचे नाव फायनल होताच सगळेच आश्चर्यचकित झाले. पण खात्रीलायक सूत्रांच्या महितीनुसार एका मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या हिमांशु मिश्रा यांच्या रिपोर्टनुसार या मास्टरस्ट्रोकचा मुख्य उद्देश शिवसेनेला ठराविक लोकांच्या नियंत्रणातून बाहेर काढणे हा आहे. यातच पुढे जाऊन त्यांनी या मास्टर स्ट्रोकची काही मुख्य कारणे सांगितली आहेत –
– शिवसेनेवर आता एकनाथ शिंदेंचे नियंत्रण असेल
– अंतर्गत कलहांमुळे शिवसेनेचे विभाजन झाले
– फडणविसांना आता केंद्रात बोलावलं जाऊ शकतं
– 2019 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री न बनवण्याचा बदला घेतला गेला
– मा. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवल्याने मा. उद्धव यांच्या गटातले आमदारही शिंदे गटात येतील
– शिवसेना कमजोर झाल्याने भाजपाला येत्या निवडणुकांमध्ये फायदा होईल. आता त्यांना सरळ सरळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढता येईल.
– 2019 मध्ये मा. अजितदादांच्या बरोबरील क्षणिक युतीमुळे गेलेल्या चुकीच्या संदेशाला पुसून टाकून भाजपा सत्तेची लालची नाही हे जगासमोर आणणे
– भाजपा हाही संदेश देऊ इच्छिते की ती मा. बाळासाहेब ठाकरेंच्या परंपरेचं समर्थन करते आणि म्हणूनच एका शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवते
याशिवाय भाजपा यावरही लक्ष ठेऊन आहे की मा. उद्धव ठाकरेंच्या भावुक भाषणांना लोक भुलू नयेत व असे समजू नयेत की सत्तेच्या लालसेने भाजपाने कावेबाजपणे मा. उद्धव ठाकरेंची खुर्ची काढून घेतली. शिवाय एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवून 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा हा संदेश पोहोचवू शकेल की शिवसेना त्यांच्याबरोबर आहे.
असा हा मास्टरस्ट्रोकने सगळ्या विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.