मुंबई प्रतिनिधी :
दि. 1 जुलै 2022
बरेच वेळा प्रदर्शन पुढे ढकलला गेलेला आर. माधवनचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकेटरी – द नंबी इफेक्ट’ अखेर प्रदर्शित झाला आहे. माधवनने फक्त या चित्रपटात अभिनयच केला नसून त्याने हा चित्रपट दिग्दर्शित देखील केला आहे. हा चित्रपट ‘नंबी नारायण’ यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात सिमरन सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. रॉकेटरी विभिन्न भाषांमध्ये निर्माण झाला आहे. हिन्दी भाषेतील या चित्रपटाचा कॅमिओ शाहरुख खानने तर तर तामिळ व्हर्जन मध्ये सूर्याने काम केले आहे.
या चित्रपटच्या ट्रेलरने सर्वांनाच प्रभावित केले होते. आता चित्रपटाने अभूतपूर्व यशाची नांदी केली आहे.
नेटीझन्स मध्ये या चित्रपटाची तुफान क्रेझ दिसून येते आहे. ते याला ‘मास्टरपीस’ म्हणून लाईक करत आहेत. हा चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या तोडीचा आहे असेही त्यांचे मत आहे. हा चित्रपट हिन्दी, तामिळ, इंग्लिश, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये तयार झाला आहे. ‘इस्रो’चे साईंटिस्ट नंबी नारायणन यांच्या कार्यावर आधारित हा चित्रपट नेटीझंसचं आणि तरुणाईचं खास आकर्षण ठरतो आहे. या चित्रपटाला विविध वृत्तपत्रांनी आणि जाणकारांनी 5 पैकी 3.5 चे रेटिंग दिले आहे. या चित्रपटाची ‘माऊथ पब्लिसिटीच’ त्याला फार मोठे यश देऊन जाईल आणि ‘द कश्मीर फाईल्स’ सारखे दणदणीत यश त्याला लाभेल असे जाणकारांचे मत आहे.