चंडीगड प्रतिनिधी :
दि. 07 जुलै 2022
आत्ताच एका राज्याचे ते मुख्यमंत्री झाले आणि लगेच दुसर्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याची तयारीही त्यांनी केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज दुसर्यांदा बोहल्यावर चढत आहेत.
त्यांचा विवाह पेशाने डॉक्टर असलेल्या गुरप्रीत कौर यांच्याशी चंडीगड मध्ये आज संपन्न होतो आहे. विवाहाला मोजकेच पाहुणे उपस्थित असतील. भगवंत मान यांच्या आई वडिलांनीच गुरप्रीत यांना मान यांच्यासाठी पसंत केले आहे. चंडीगढच्या सीएम हाऊसमध्ये हा विवाह होतो आहे.
साधारण सहा वर्षांपूर्वी आपली पहिली पत्नी इंदरप्रीत कौर यांना त्यांनी घटस्फोट दिला होता. आज विवाह असला तरी कालपासूनच जवळचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. पहिल्या पत्नीपासून मान यांना एक मुलगा दिलशान मान आणि एक मुलगी सीरत कौर अशी अपत्ये आहेत. ते दोघेही अमेरिकेत राहातात. त्यांनी दूसरा विवाह करून आपला संसार सुरू करावा ही त्यांच्या आईची इच्छा होती. मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांच्या शपथविधीच्या वेळी त्यांचा मुलगा दिलशान आणि मुलगी सीरत अमेरिकेहून आले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विवाहसोहळा छोट्या प्रमाणात आणि मोजक्या उपस्थितांच्या साक्षीने संपन्न होतो आहे.