मुंबई प्रतिनिधी :
दि. 11 जुलै 2022
मुलुंड येथे 22 वर्षांच्या एका तरुणाने आपल्या आईची चाकूने गळा कापून हत्या केली. नंतर स्वतः ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार मुळावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वाच्या मागे प्रॉपर्टीचा वाद असल्याचं समजतं आहे.
ही घटना मुलुंड येथील वर्धमान सोसायटीतील आहे. शुक्रवारी संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास शेजार्यांनी छाया पांचाळ यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलेलं पहिलं. त्यांनी त्वरित पोलिसांना पाचारण केलं. पोलिस छाया यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
शेजार्यांच्या महितीनुसार त्यांनी काही वेळापूर्वीच जयेश पांचाळ (मृत महिलेचा मुलगा) याला घरातून बाहेर जाताना पहिलं होतं. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना जयेशनेही मुलुंड स्टेशनला ट्रेनसमोर उडी घेतल्याची माहिती मिळाली. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं जेथे त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं समजतं.
जयेशने लिहिलेलं पत्र लागलं पोलिसांच्या हाती
मुंबई पोलीस डीसीपी प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना जयेशने लिहिलेलं एक पत्र मिळालं आहे ज्यावरून त्यानंच आपल्या आईचा धारदार चाकूनं खून केल्याचं स्पष्ट झालं आहे. सुरुवातीच्या तपासात यामागे प्रॉपर्टीचा वाद असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी भादंवी च्या कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.