DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

केजरीवाल यांचे आवडते अमानतुल्ला खान सीबीआयच्या कचाट्यात?

उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा कारवाईचा हंटर?

DD News Marathi by DD News Marathi
July 19, 2022
in राजकीय
0
केजरीवाल यांचे आवडते अमानतुल्ला खान सीबीआयच्या कचाट्यात?

दिल्ली प्रतिनिधी :
दि. 19 जुलै 2022

लवकरच केजरीवाल यांचे आवडते अमानतुल्ला खान गजाआड जाण्याची चिन्हे दिसत आहेत असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता खान हेही जेलवारीच्या मार्गावर आहेत कारण त्यांचाही भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे.

आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरोधात उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. 2016 सालच्या दिल्ली वक्फ बोर्डात नेमणुकीच्या वेळी झालेला घोळ आणि सरकारी तिजोरीला नुकसान पोहोचवण्याच्या संदर्भात हे आदेश असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अमानतुल्ला खान यांच्याबरोबरच वक्फ बोर्डाचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी मेहबूब आलम यांच्याविरोधातही केस दाखल करण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. आरोप असा आहे की या दोघांनी आपापल्या पदांचा दुरुपयोग करून बोर्डात आपल्या संबंधितांची नियुक्ती केली, कारण जेव्हा हा घोळ घातला गेला तेव्हा अमानतुल्ला खान हे बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच मेहबूब आलम खान हे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांनी मिळून यादरम्यानाच सरकारी तिजोरीला मोठं भगदाड पाडलं आणि आपले खिसे भरले. बोर्डाने स्वीकृत आणि गैरस्वीकृत पदांवर मनमानी करून, जाणून बुजून नियमांची पायमल्ली करून आणि हजारो लायक लोकांना डावलून आपल्या सग्यासोयर्‍यांना रुजू केलं. आता याच भ्रष्टाचाराचा सीबीआय हिशोब करेल. इमानदार सरकारचा ढोल बडवणार्‍या केजरीवाल यांचं पितळ यामुळे उघडं पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmanatullahKhan#CBI#Kejriwal#VKSaxena#WaqfBoard
Previous Post

उद्धव ठाकरे यांचे 14 मंत्री आणि रामदास कदम शिंदे गटात?

Next Post

राष्ट्रवादीचे राजन पाटील अखेर भाजपामध्ये?

Next Post
राष्ट्रवादीचे राजन पाटील अखेर भाजपामध्ये?

राष्ट्रवादीचे राजन पाटील अखेर भाजपामध्ये?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.