मुंबई प्रतिनिधी :
दि. 20 जुलै 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शरद पवार यांनी डाव साधून शिवसेना फोडली” असा आरोप नुकतेच शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी केला आहे. पुढं ते असंही म्हणाल्याचं समजतंय की त्यांनी उद्धव साहेबांना वारंवार सांगितलं होतं की राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर हात मिळवणी करू नका!
त्यांनी आणि इतर शिवसैनिकांनी सगळं उभं केलेलं असल्याने त्यांना आज दुःख होतंय, वेदना होतयात. शरद पवार आणि सोनिया गांधी या दोघांविरुद्ध लढण्यात बाळासाहेबांनी आजन्म संघर्ष केला आणि हिंदुत्त्व वाढवलं. आज सार्या जगात हिंदूहृदयसम्राट म्हणून शिवसेना प्रमुखांची ओळख आहे आणि ते गेल्यावर त्यांचाच मुलगा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या शेजारी जाऊन बसतो आहे हे त्यांच्याकडून बघवलं गेलं नाही आणि मागच्या दोन ते तीन वर्षांत ते मातोश्रीची पायरी चढलेले नाहीत. त्यांना हे आजिबात सहन झालं नाही असं डोळ्यांत पाणी आणून रामदास कदम म्हणाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय.
पुढे रामदास कदम असं म्हणाल्याचं सूत्र सांगतात की उद्धवजी भोळे असल्याने शरद पवारांचा डाव ते समजू शकले नाहीत आणि आज शिवसेना फोडलीये ती शरद पवारांनी फोडलीये. या महितीनुसार कदम पुढे म्हणाले की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं होतं की कोकणातल्या त्यांच्या कुणबी समाजाला हाताशी धरून, शासनाचे पाच-पाच कोटी रुपये देऊन शरद पवार शिवसेना कशी फोडतायत. या सर्व कागदपत्रांचा गट्ठा त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला होता. हा गट्ठा एकनाथ शिंदेंबरोबरच त्यांनी पाठवला होता. हे सर्व पुरावे कागदपत्रांसह, फोटोंसह त्यांनी पाठवले होते
सूत्रांच्या माहितीनुसार शेवटी कदम असं म्हणाले की तेव्हा जर उद्धव साहेबांनी नोंद घेतली असती, तर एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांनी कधीच असा निर्णय घेतला नसता आणि रामदास कदमसारख्या कडव्या शिवसैनिकाला राजीनामाही द्यावा लागला नसता!