DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सर्वोच्च न्यायालयाची राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास मान्यता

DD News Marathi by DD News Marathi
July 21, 2022
in राजकीय
0
ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई प्रतिनिधी :

दि. 21 जुलै 2022

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश काल दिले. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. यावर माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्यच असते आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व घटक पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो.

हा पेच अवघड होता. पण तो सोडविण्यासाठी त्यावेळेस आम्ही विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वेळोवेळी चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले त्याबद्द्ल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच, शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले.

खरे तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती, तिला यश मिळाले यासारखे समाधान नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचे समजते.

दरम्यान, या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत पहिली प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निकालानंतर ट्विट करुन फडणवीस म्हणाले, आमच्या महायुती सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाचा दिलेला शब्द पाळला! सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा समस्त ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadanvis#Mahayuti#OBCresevation#SupremeCourt#UddhavThakare
Previous Post

नॅशनल हेराल्ड केस – कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार. सोनिया गांधी यांची आज चौकशी

Next Post

राष्ट्रपतीपदासाठी मतमोजणी सुरू. मुर्मू आघाडीवर

Next Post
राष्ट्रपतीपदासाठी मतमोजणी सुरू. मुर्मू आघाडीवर

राष्ट्रपतीपदासाठी मतमोजणी सुरू. मुर्मू आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.