पुणे प्रतिनिधी :
दि. 03 ऑगस्ट 2022
खानापूर गाव पुण्यासारख्या अतिशय प्रगत शहरापासून अगदीच जवळ तरी त्याची कुठलीही झलक या गावाच्या विकासात दिसत नाही. गावाच्या प्रगतीची काळजी सत्ताधार्यांना आहे किंवा गावाच्या कल्याणाशी कुणाला काही देणं घेणं आहे असा पुसटसा पुरवादेखील सगळं गाव पालथं घातलं तरी सापडत नाही.
शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य सुविधा, मूलभूत सुविधा या सगळ्यापासून खानापूर गाव वंचित आहे. सत्ताधार्यांचा नाकर्तेपणा, इच्छाशक्तीचा अभाव आणि गावाच्या प्रगतीबाबत कमालीची उदासीनता याला कारणीभूत आहे असे दिसते.
या पार्श्वभूमीवर, गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या, सुधाकर बबन गायकवाड आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील ‘श्रीकाळभैरवनाथ आणि श्रीनाथ म्हस्कोबा परिवर्तन ग्रामविकास’ पॅनल’च्या सर्व तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्धार केलाय. म्हणूनच या समविचारी तरुणांनी ‘श्रीनाथ व श्री काळभैरवनाथ ग्रामपरिवर्तन विकास’ पॅनलची निर्मिती केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ते जनतेसमोर येत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासाचा आणि उन्नतीचा ध्यास उराशी बाळगलेल्या तरुणांच्या या पॅनलला गावकर्यांनी साथ द्यावी अशी तळमळीची भावना या उमेदवारांशी बोलताना जाणवली.
गावकरी आता सत्तापरिवर्तनासाठी तयार असल्याचे वातावरण सर्वत्र दिसून आले. ‘श्री काळभैरवनाथ आणि श्रीनाथ म्हस्कोबा परिवर्तन ग्रामविकास’ पॅनलचे तरुण आणि सुशिक्षित उमेदवार विरुद्ध सध्याचे उदासीन सत्ताधारी असा हा सामना असल्याने खानापूरचे ग्रामस्थ या पॅनलच्या उमेदवारांना पसंती देतील असे चित्र सर्वत्र दिसते आहे.